सनातनचा साधक कु. शिवम कावरे याला १० वीत ९२.४० टक्के !

मी नियमितपणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना प्रार्थना अणि कृतज्ञता व्यक्त करत होतो. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे हे यश प्राप्त झाले असून यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.

कु. आर्य नाईक यास १२ वीत ९१.६७, तर कुमारी संजना कुलकर्णी हिला ९०.३३ टक्के

१२ वीच्या परीक्षेमध्ये पुणे येथील सनातनच्या साधकांचे सुयश !

नाशिक येथील महापालिकेच्या शिक्षणाधिकार्‍याला लाच घेतांना अटक !

‘एसीबी’च्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशाने पथकाने सुनीता यांच्या घराची झडती घेतली असता लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरातून ८५ लाख रुपयांची रोकड आणि ३२ तोळे सोने सापडले आहे.

दहावीचा निकाल ९३.८३ टक्के !

कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल : दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ सहस्र २५६ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी १५ लाख २९ सहस्र ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील १४ लाख ३४ सहस्र ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यभरातील ५ सहस्र ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

ठाणे जिल्‍ह्यात ४७ शाळा अनधिकृत !

अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी त्‍यांच्‍या पाल्‍यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभागाने केले आहे.

दमोह (मध्यप्रदेश) येथील खासगी शाळेत हिंदु मुलींनी परिधान केला हिजाबसारखा गणवेश !

सरकारकडून चौकशीचा आदेश !

कल्‍याण-डोंबिवली महापालिका परिसरातील १० शाळा अनधिकृत म्‍हणून घोषित

अनधिकृत शाळांची निर्मिती होऊन त्‍या चालू झाल्‍या, तरी शिक्षण विभागाला लक्षात कसे येत नाही ?

शाळांमध्‍ये पहिल्‍याच दिवशी पाठ्यपुस्‍तके मिळणार, १ कोटी ७ लाख विद्यार्थ्‍यांना होणार वाटप !

शिक्षणाच्‍या नवीन धोरणानुसार इयत्ता १ ते ८ वीच्‍या सर्व विद्यार्थ्‍यांना विनामूल्‍य पाठ्यपुस्‍तके देण्‍यात येणार आहेत. या वर्षी ४ लाख २९ सहस्र पाठ्यपुस्‍तकांची छपाई करण्‍यात आली आहे.

प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला ३०० रुपयांचा एक गणवेश शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी देणार !

प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला ३०० रुपये किमतीचा एक गणवेश शाळा व्‍यवस्‍थापन समितीच्‍या माध्‍यमातून शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी उपलब्‍ध करून देण्‍याचे सूचित करण्‍यात आले आहे.

प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

व्यक्तीमत्त्व विकास आणि कौशल्य यांवर आधारित प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.