ऑस्ट्रेलियातील शाळांमध्ये शीख विद्यार्थ्यांना ‘कृपाण’ बाळगण्यास न्यायालयाची अनुमती !

(कृपाण म्हणजे छोटा चाकू. हे शिखांच्या पाच धार्मिक प्रतिकांपैकी एक असून ते प्रत्येक शिखाने स्वत:समवेत नेहमी बाळगावे, अशी त्यांच्या धर्माची शिकवण आहे.)

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) – देशातील क्वीन्सलँड प्रांतातील सरकारने शाळांमध्ये शीख विद्यार्थ्यांना स्वत:समवेत ‘कृपाण’ बाळगण्यावर प्रतिबंध लादला होता.

याविरोधात कमलजीत कौर अठवाल या शीख महिलेने क्वीन्सलँड प्रांतातील सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने सरकारने कृपाणवर लावलेला प्रतिबंध घटनाबाह्य असल्याचे सांगून शाळांमध्ये शीख विद्यार्थी कृपाण घेऊन जाऊ शकतात, असा निर्णय दिला आहे.