स्त्रीद्वेषाचा पुरस्कार करणार्‍या तालिबानी कायद्यांमागील प्रेरणा इस्लाममधून मिळते ! – तस्लिमा नसरीन

तस्लिमा नसरीन

नवी देहली – तालिबानने आता इयत्ता तिसरीनंतर मुलींच्या शिक्षणावर प्रतिबंध लादला आहे. उंच झालेल्या आणि १० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलींना शाळेत जाऊ दिले जात नाही.

तालिबानला महिलांचे शिक्षण, स्वातंत्र्य, एकता आणि शक्ती यांची भीती वाटते. मुळात स्त्रीद्वेषाचा पुरस्कार करणार्‍या तालिबानी कायद्यांमागील प्रेरणा इस्लाममधून मिळते, असे ट्वीट प्रसिद्ध लेखिका आणि मुसलमानांच्या धर्मांधतेविषयी उघडपणे बोलणार्‍या तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.