राज्यातील शैक्षणिक वर्षाला १४ जूनपासून प्रारंभ !
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना १ मेपासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली आहे. वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाला १४ जूनपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.