फ्रान्समधील ९६ टक्के माध्यमिक शाळांमध्ये गर्भनिरोधक मिळणारी यंत्रे !

पाश्‍चात्त्य समाजामध्ये नैतिकता रसातळाला गेल्यामुळे ते प्राण्यांप्रमाणे वागतात, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! त्यातून पुढे निर्माण होणार्‍या समस्यांवर अशा प्रकारच्या उपाययोजना काढाव्या लागतात. पुढील काही वर्षांत अशी स्थिती भारतात येण्यापूर्वीच मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी धर्माचरणी शासनकर्ते हवेत !

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समधील ९६ टक्के माध्यमिक शाळांमध्ये गर्भनिरोधक मिळणारी यंत्रे बसवण्यात आली आहेत. सरकारने म्हटले आहे की, लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देणे आणि अल्पवयात होणारी गर्भधारणा रोखण्यासाठी असा प्रयत्न करण्यात आला आहे. या यंत्रांतून आवश्यकतेनुसार निरोध काढता येऊ शकतात. काही वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये एड्स रुग्णांची संख्या पुष्कळ होती. त्यामुळेही सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात येत आहे.

फ्रान्समध्ये अशा प्रकारचे यंत्र प्रथम वर्ष १९९२ मध्ये लावण्यात आले होते. तेव्हा त्याचा विरोध करण्यात आला होता. नंतर सरकारने या संदर्भात जनजागृती अभियान राबवल्यावर समाजाकडून याला समर्थन मिळाले.