नवी देहली – कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ‘जेईई मेन’ (जॉईंट एन्टरन्स एक्झामिनेशन) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याची घोषणा केली आहे. परीक्षेचा सुधारित दिनांक परीक्षेच्या १५ दिवस आधी घोषित केला जाणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च मासांमध्ये पहिल्या २ सत्रांतील परीक्षा पूर्ण झाल्या असून एप्रिलच्या सत्रात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २७, २८ आणि ३० एप्रिल या दिवशी ही परीक्षा होणार होती.
ABVP welcomes National Testing Agency’s decision to postpone JEE (Main) exam in view of increasing Covid-19 cases across India. This decision was necessary owing to health and well-being of students and their families. pic.twitter.com/SQFx6Lf5T0
— ABVP (@ABVPVoice) April 18, 2021