बिहारमध्ये १४ वर्षीय मुलींवर ४ मुले आणि मुख्याध्यापक यांच्याकडून बलात्कार !

मुलांना दिशादर्शन करण्याऐवजी मुख्याध्यापकच बलात्कार करत असेल, तर असे मुख्याध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेली कीड आहे. अशांना फाशीची शिक्षा हवी !

महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही !

एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांना ऑनलाईन भरता येत नाही.

मदरशांमध्ये शिकणार्‍या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रहित !

असे आहे, तर याआधीच हा निर्णय घेणे आवश्यक होते. जनतेचे सहस्रो कोटी रुपये अशा प्रकारे व्यय (खर्च) होऊ देणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांकडून ही रक्कम वसूल करा !

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापिठाने शीख विद्यार्थ्यांना कृपाण (लहान चाकू) धारण करण्यास दिली अनुमती !

शिखांचे १० वे गुरु गोविंद सिंह यांनी शिखांसाठी ५ गोष्टी अनिवार्य केल्या होत्या. यात केस, कडा, कृपाण, कचेरा (अंतर्वस्त्र) आणि कंगवा यांचा समावेश आहे. 

कर्नाटकमध्ये बांधलेल्या ७ सहस्र ५०० नवीनवर्गखोल्यांना भगवा रंग देणार ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

कर्नाटक सरकार शाळांमध्ये ‘विवेक’ योजनेच्या अंतर्गत ७ सहस्र ५०० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करत आहे. या खोल्या भगव्या रंगाने रंगवल्या जाणार असून भगव्या रंगाची निवड वास्तूविशारदांच्या सल्ल्यानुसार करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी नुकतीच दिली.

आधुनिकतेच्या नावाखाली बोकाळलेला स्वैराचार आणि ढासळलेली नैतिकता !

‘सध्याची शिक्षणपद्धत अशी झाली आहे की, मुलांना थोर आध्यात्मिक व्यक्तींचे मोठेपण दाखवण्याची सोय राहिली नाही. जीवन मूल्यांविषयी सर्वत्र प्रचंड अज्ञान पसरलेले आहे. या तरुणांना मूलभूत मूल्यांचे शिक्षण देऊन उच्च आदर्श कोण प्रस्थापित करणार आहे ?

शिक्षण हा नफा कमावण्याचा व्यवसाय नव्हे ! – सर्वोच्च न्यायालय

आंध्रप्रदेश सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क २४ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांनी सरकारच्या या निर्णयाला आंध्रप्रदेशन उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

इयत्ता १० आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ !

अंतिम वार्षिक परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी २५ नोव्हेंबर, तर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

देशाला प्रगत आणि समृद्ध करणार्‍या गुरुकुल शिक्षणव्यवस्थेचे महत्त्व !

प्रत्येकाच्या मनात हिंदुत्वाची भावना जागृत झाल्यास भारत पुन्हा विश्वगुरु व्हायला वेळ लागणार नाही !

शाळांमधील अल्प पटसंख्येत शिक्षण नीट होत नाही ! – हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ञ

अल्प पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे सध्या वादळ उठले आहे. शैक्षणिक वर्तुळातून याला तीव्र विरोध होत आहे; मात्र विरोध केवळ भावनिक होऊ न घेता वास्तव समजून घेण्यात यावे.