महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही !

मुंबई – राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची माहिती ‘सरल’ प्रणालीमध्ये भरत असतांना १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याची माहिती पुढे आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांना ऑनलाईन भरता येत नाही.

विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन, विनामूल्य पुस्तके आणि गणवेश मिळण्यासाठी ‘सरल’ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरावी लागते. या प्रणालीमुळे सर्व विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन एकत्र उपलब्ध होते. त्यामध्ये आधारकार्डची नोंदणी आवश्यक असते. महाराष्ट्रात ही नोंदणी सध्या चालू आहे. ही माहिती भरण्यासाठी असलेली ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत वाढवण्याची मागणी शिक्षकांकडून शासनाकडे करण्यात आली आहे.