बिहारमध्ये १४ वर्षीय मुलींवर ४ मुले आणि मुख्याध्यापक यांच्याकडून बलात्कार !

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील एका गावात १४ वर्षांच्या मुलीचे गावातील ४ मुलांनी अपहरण केले आणि निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या वेळी शाळेचा मुख्याध्यापक सुरेंद्रकुमार भास्कर तेथे पोचला. मुख्याध्यापकाला पाहताच मुलांनी तेथून पळ काढला. त्या वेळी पीडित मुलीला वाचवण्याऐवजी मुख्याध्यापकानेही तिच्यावर बलात्कार केला.

१. शाळेच्या मुख्याध्यापकाने ४ मुले एका विद्यार्थिनीला बलपूर्वक पळवून नेत असल्याचे पाहिले. त्यांनी त्यांचा पाठलाग केला.

२. पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, मुख्याध्यापक मला वाचवेल असे वाटले होते, परंतु त्यांनीही माझ्यावर बलात्कार केला आणि मला रक्ताने माखलेल्या स्थितीत सोडून निघून गेले.

३. या प्रकरणी मुख्याध्यापक आणि ४ मुले यांच्या विरोधात ‘लैंगिक गुन्हा संरक्षण कायद्या’च्या (पोक्सोच्या) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

४. मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे, तर आरोपी मुले फरार आहेत. ‘त्यांना लवकरच अटक करण्यात येईल’, असे पोलीस अधीक्षक सुनील कुमार यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

मुलांना दिशादर्शन करण्याऐवजी मुख्याध्यापकच बलात्कार करत असेल, तर असे मुख्याध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेली कीड आहे. अशांना फाशीची शिक्षा हवी !