ताण कशाला ?

ताण हा प्रत्येकाच्या जीवनात असतोच, मग तो कार्यालयीन अधिकारी असो वा विद्यार्थी असो ! विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परीक्षा म्हटले की, नकळत ताण आलाच. मग तो वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याच्या मनाची काहीशी स्थितीही पहिल्यांदा १० वीची बोर्डाची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यासारखीच असते.

ठाणे येथे अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण करणार्‍या मदरशातील शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद !

शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे; परंतु तो पळून गेला असून पोलिसांकडून त्याचा शोध चालू आहे. १४ वर्षांच्या मुलाने धडे नीट लक्षात न ठेवल्यामुळे शिक्षकाने मारहाण केली.

वैज्ञानिक दृष्टीकोनांच्या कार्यक्रमांची अनुमती शिक्षणाधिकार्‍यांकडून रहित !

वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या गोंडस नावाखाली हिंदु धर्म, संत, परंपरा, श्रद्धास्थाने यांवर आघात करून विद्यार्थ्यांना नास्तिक बनवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इतिहास आहे.

व्हिडिओ गेम खेळण्यास थांबवल्याने विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला अमानुष मारहाण !

विद्यार्थी वर्गात व्हिडिओ गेम खेळत असल्याने शिक्षिकेने ते थांबवण्यास सांगितल्यावर त्याला राग आला आणि त्यातून त्याने शिक्षिकेला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे.

शक्तीशाली भारतासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता ! – नारायण मूर्ती, ‘इन्फोसिस’चे संस्थापक

‘मेरा भारत महान’ वगैरे जयघोषाने काहीही होणार नाही. भारताला आर्थिकदृष्ट्या शक्तीशाली करण्यासाठी प्रत्येक भारतियाने कठोर परिश्रम करून वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणाचा अंगीकार करावा, हा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे संस्थापक श्री. नारायण मूर्ती यांनी केले.

१२ परीक्षा केंद्राच्‍या ५० मीटर क्षेत्रातील झेरॉक्‍स दुकाने बंद !

मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीमुळे मुलांमधील प्रामाणिकपणा नष्‍ट होत असल्‍याचे उदाहरण !

दारुल उलूम देवबंद शिक्षण संस्थेने दाढी केलेल्या ४ विद्यार्थ्यांची केली हकालपट्टी !

जो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आला आहे त्याने दाढी काढू नये. जो विद्यार्थी दाढी काढेल त्याची हकालपट्टी करण्यात येईल.इस्लाममध्ये दाढीला पुष्कळ महत्त्व आहे.

पनवेल येथे १२ वीतील विद्यार्थ्याची अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या !

विद्यार्थ्यांनो, इतके टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा तणाव निर्मूलनासाठी प्रयत्न करा ! मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे तणावाला सामोरे न जाणार्‍या पिढीसाठी लवकरात लवकर धर्मशिक्षणाची सोय होणे अपेक्षित !

अंनिसच्या कार्यक्रमांना दिलेली अनुमती रहित करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख म्हणाले, ‘‘मी अनुमती दिलेली नाही. कदाचित् प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी अनुमती दिलेली असावी.’’

राज्यशासन अनुसूचित जातीच्या १०० विद्यार्थ्यांना नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण देणार !

शासकीय निधीतून लाभ देतांना विद्यार्थ्यांमध्ये समाज आणि राष्ट्र यांप्रती कर्तव्यभावना निर्माण होण्यावर शासनाने भर द्यावा !