पनवेल येथे १२ वीतील विद्यार्थ्याची अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

पनवेल – येथील इयत्ता १२ वीचा विद्यार्थी वंश म्हात्रे (वय १७ वर्षे) याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केली. परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे २० फेब्रुवारीच्या रात्री आई-वडील घरात नसतांना त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी लॅचने दरवाजा उघडल्यावर वंशचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलीस या प्रकरणी पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • विद्यार्थ्यांनो, इतके टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा तणाव निर्मूलनासाठी प्रयत्न करा !
  • मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे तणावाला सामोरे न जाणार्‍या पिढीसाठी लवकरात लवकर धर्मशिक्षणाची सोय होणे अपेक्षित !