गेल्या ५ वर्षांत आश्रमशाळांमधील ९६२ विद्यार्थी दगावले ! – आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित

‘समर्थन’ या संस्थेसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘मुलांचा आजार बळावल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येते’, असे नमूद केले. तसेच ‘ज्या पाड्यांमध्ये आरोग्यव्यवस्था उपलब्ध नाही, तिथे शेवटच्या क्षणी विद्यार्थ्यांवर उपचार कसे करणार ?

ओझ्याविना अध्ययन !

के.ई.एम्. रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी वर्ष २०१८ मध्येच सर्वेक्षण करून असे सांगितले होते की, मुंबई येथील ४१ टक्के विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीचा त्रास चालू झाला.

‘श्री ज्ञानेश्‍वरी’ आणि ‘हरिपाठ’ शालेय शिक्षणात अंतर्भूत करण्‍यासाठी ‘संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्‍थान’चा पुढाकार !

संस्‍कारक्षम पिढी घडवण्‍यासाठी संतविचार आवश्‍यक असून त्‍याचे संस्‍कार प्राथमिक शिक्षणापासून देण्‍याच्‍या उद्देशाने ‘श्री ज्ञानेश्‍वरी’ आणि ‘हरिपाठ’ यांचा शालेय शिक्षणात प्रथमच स्‍वतंत्र अभ्‍यासक्रम सिद्ध करण्‍यात येत आहे.

विद्यार्थिंनी आणि शिक्षिका यांना हिजाब परिधान करणे बंधनकारक

पाकव्याप्त काश्मीर सरकारने नुकत्यात काढलेल्या एका आदेशात तेथील शाळा आणि महाविद्यालये यांत शिकणार्‍या विद्यार्थिंनी अन् शिक्षिका यांना हिजाब परिधान करणे बंधनकारक केले आहे.  सरकारच्या या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

विद्यार्थ्‍यांच्‍या भवितव्‍याशी खेळ !

आताही स्‍वार्थी आणि लोभी वृत्ती बाजूला ठेवून तरुण पिढीच्‍या आणि पर्यायाने भारताच्‍या उज्‍ज्‍वल भवितव्‍यासाठी तातडीने अन् कठोर उपाययोजना केल्‍यास शिक्षणक्षेत्रातील खालावलेली स्‍थिती निश्‍चितच सुधारू शकेल.

मुलाला कॉपी पुरवणार्‍या वडिलांना पोलिसांनी दिला चोप !

राज्‍यात दहावी-बारावीच्‍या परीक्षा चालू आहेत. यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे राज्‍यात कॉपीमुक्‍त अभियान राबवण्‍यात येत आहे. असे असतांनाही काही ठिकाणी सर्रासपणे कॉपी चालू असल्‍याच्‍या घटना समोर येत आहेत.

ब्रिटीश राजवटीपूर्वी भारतात ७० टक्के लोकसंख्या शिक्षित होती ! – सरसंघचालक !

भारताची शिक्षणव्यवस्था केवळ रोजगारासाठी नव्हे, तर ज्ञानाचेही माध्यम होती. सर्वांना स्वस्त दरात शिक्षण उपलब्ध होते. शिक्षणाचा सर्व खर्च समाजाने उचलला होता. यातून अनेक कलाकार, विद्वान मंडळी जगभर ओळखली गेली..

इराणमध्ये पालकांनी सरकारच्या विरोधात केली आंदोलने !

इराणमध्ये शालेय शिक्षण घेणार्‍या ९०० हून अधिक विद्यार्थिनींना विष दिल्याचे प्रकरण अधिक जटील होत चालले आहे. देशात काही ठिकाणी या प्रकरणी विद्यार्थिनींच्या पालकांनी आंदोलने केली. या वेळी त्यांनी ‘विषबाधा करणारे  इस्लामिक स्टेटप्रमाणे आहेत’, असे म्हटले.

छत्रपती संभाजीनगर विभागात १० दिवसांमध्ये पकडले ९७ कॉपीबहाद्दर !

आधुनिक शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम ! आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे नैतिकता उंचावत नसून कसेही करून केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्याची घातक मानसिकता बळावत आहे.

लाच स्वीकारतांना मुख्याध्यापिकेसह शिक्षक पोलिसांच्या कह्यात !

शिक्षण संस्थेला काळीमा फासणारी घटना ! असे लाचखोर शिक्षक विद्यार्थ्यांना काय घडवणार ?