पुन्हा नथुराम !

‘पंडित नथुराम गोडसे यांनी ‘गांधी यांना ३ गोळ्या मारल्या होत्या’, असे जबानीत सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात गांधी यांच्या शरिरातून ४ गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. तर मग चौथी गोळी त्यांना कुणी मारली ?  हे त्या वेळी का शोधण्यात आले नाही ?

धर्मांधांची खुनशी वृत्ती !

अवमानाच्या घटनेच्या संदर्भात सहिष्णु हिंदू वैध मार्गाने निषेध करत आहेत, हेही नसे थोडके. हिंदूंचे व्यापक आणि प्रभावी संघटनच हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान अन् त्यांच्यावरील आक्रमणेही रोखेल हे निश्चित !

अंनिसवाल्यांची भोंदूगिरी !

‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’, हे घोषवाक्य असलेल्या अंनिसवाल्यांचे मतभेद हे वैचारिक नसून आर्थिक, मानसन्मान, प्रतिष्ठा अशा स्वार्थामध्ये गुंतलेले आहेत.

राष्ट्रीय अस्मिता केव्हा जोपासणार ?

स्वसंस्कृतीतील महापुरुषांची नावे राष्ट्र आणि धर्म अस्मिता सदैव जागृत ठेवतात आणि परकीय आक्रमकांची नावे या अस्मितेचा लय करतात. देशातील सर्वत्रची परकीय आक्रमकांची नावे कायमस्वरूपी पुसण्यासाठी जनतेला हिंदु राष्ट्राची वाट पहावी लागणार आहे, असेच वाटते !

निवडणुकांत राष्ट्रहिताचा विचार कधी ?

उमेदवारांच्या घोषणांपासून एका पक्षाने तिकीट नाकारल्यावर लगेच दुसर्‍या पक्षात जाणे, राजकीय आरोप-प्रत्यारोप, व्यक्तीगत हेवे-दावे, ज्या परिवर्तनाच्या अपेक्षेने जनता मतदान करते, ते यातून साध्य होते का ? हा खरोखरच चिंतन करायला लावणारा प्रश्न आहे !

रशिया-युक्रेन वादाचा अन्वयार्थ !

भारताने सावध भूमिका घ्यावी ! गेल्या दशकभरात जगात रशियाचे वाढते वर्चस्व अमेरिकेचे महासत्तापद धोक्यात आणणारे ठरले आहे. आता युक्रेनचे निमित्त करून वरील वाद चिघळवून अमेरिका रशियाला नमवण्याचा आणि एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हाच रशिया-युक्रेन वादाचा अन्वयार्थ आहे !

धर्मयोद्धे पुरातत्वज्ञ : डॉ. नागस्वामी

भारतातील ऐतिहासिक ठेवा जपायचा असेल, तर हिंदुत्वाची बैठक असलेल्या डॉ. नागस्वामी यांच्यासारख्या पुरातत्वज्ञांची नितांत आवश्यकता आहे. अशा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी पुरातत्वज्ञांनी डॉ. नागस्वामी यांचा वारसा पुढे चालवणे, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल !

चीनचे तुकडे !

चीनप्रमाणेच पाक सैन्यही सैन्यावर प्रचंड खर्च करत असल्याने सामान्य लोकांना जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे आणि त्याचाच परिणाम त्याचे तुकडे होण्यावर होईल. चीन आणि पाक यांचे तुकडे भारताच्या पथ्यावर पडणार आहेत, हे मात्र नक्कीच !

बापूंकडून बाबूंकडे !

युवकांना संभ्रमित करणारे देशाच्या मानगुटीवर बसलेले गांधीवादाचे भूत बाजूला करून देशातील क्षात्रवृत्तीचा गौरव करायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर हे कार्य करणार असतील, तर समस्त भारतियांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करायला हवे !

धर्मांतरबंदी कायदा हवाच !

कॉन्व्हेंट शाळांच्या संदर्भात हिंदु मुलींना टिकली लावण्यास, बांगड्या घालण्यास अथवा भारतीय पोषाख घालून येण्यास मज्जाव करण्यात येतो. हिंदु मुलांच्या हातातील दोरे कापण्यात येतात, टिळा लावण्यास अथवा गळ्यात देवतांची पदके घालण्यास विरोध करण्यात येतो….