धर्मांधांची खुनशी वृत्ती !

हिंदूंच्या प्रभावी संघटनामुळेच त्यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान रोखला जाईल, हे निश्चित !

किशन बोलिया हत्याकांडातीलआरोपी

काही दिवसांपूर्वी गुजरात येथील किशन बोलिया यांची हत्या झाली. त्यांनी सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित केला होता, ज्यामध्ये इस्लामविषयी काही आक्षेपार्ह गोष्टी दिल्या होत्या. त्यामुळे त्यांना धर्मांधांकडून धमक्या मिळाल्यावर त्यांनी तो व्हिडिओ सार्वजनिक प्रसारणातून हटवला होता; मात्र तरी त्यांची हत्या झाली. प्रारंभी ही हत्या कुणा अज्ञातांकडून झाली असल्याचे बोलले जात होते, तसेच ‘या व्हिडिओमुळेही हत्या झाली असेल’, अशी चर्चा होती. त्यात दुसरा संशय खरा ठरला. धर्मांधांकडूनच किशन यांची हत्या झाली होती आणि तीही मशिदीच्या मौलवींच्या (इस्लामी धार्मिक नेत्याच्या) सांगण्यावरून झाली होती, हे आता पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे.

व्हिडिओ हटवल्यावरही हत्या का ?

कुणाच्याही धर्माचा अवमान करणे, हे अयोग्यच आहे आणि तो करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, यात दुमत नाही; मात्र पोलिसांच्या कारवाईपूर्वी कायदा हातात घेऊन संबंधितांची हत्या करणे हे भारतासारख्या लोकशाही देशात निषेधार्हच आहे. किशन बोलिया यांच्या संदर्भातील विचार केला, तर संबंधित व्हिडिओ काहींनी सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित केला होता. व्हिडिओ पाहिल्यावर त्यात त्याने अन्य धर्माचा अवमान न करता हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व प्रतिपादित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रथमदर्शनी आक्षेपार्ह वाटण्याजोगे नसल्याचे सामाजिक माध्यमांवरील सक्रीय असणार्‍यांच्या चर्चेतून कळते. दुसरा भाग म्हणजे किशन यांच्या या व्हिडिओवर आक्षेप घेतल्यामुळे त्यांनी तो त्वरित प्रसारित करणे थांबवले होते. त्यांच्यावर यापूर्वी असे काही केल्याचे गुन्हेही नोंद नाहीत अथवा त्यांच्याविषयी यापूर्वी कुणाची तक्रारही नव्हती. त्यामुळे केवळ व्हिडिओच्याच कारणावरून त्यांची हत्या होणे हे अत्यंत गंभीर आहे. त्यांच्या हत्येचे नियोजन मशिदीत झाले आणि तेही एका मौलवीकडून झाले, हे त्याहूनही अधिक गंभीर आहे. दुसर्‍या मौलवीने बंदूक आणि तिच्या गोळ्या पुरवल्या अन् हत्या घडवून आणली. किशन यांचे छोटे झेरॉक्सचे दुकान आहे आणि त्यांना २० दिवसांचे बाळही आहे. यातून धर्मांधांना अवमानापेक्षा किशन यांची कोणत्याही परिस्थितीत (ते हिंदु असल्यामुळे) हत्याच करायची होती, हे लक्षात येते.

भारतात १५ ते २० वर्षांपूर्वी असा काळ होता की, जम्मू आणि काश्मीर येथे प्रेषित महंमद पैगंबर यांचा एखादा केस हरवल्याच्या केवळ अफवेने भारतभर दंगली व्हायच्या. तेव्हा पोलीस आणि प्रशासन यांनी दंगलीच्या वेळी केवळ बघ्याची भूमिका घेणे आणि दंगल शमल्यावर संबंधितांना अटक करून सोडून देणे या पलीकडे काही केल्याचे स्मरत नाही. देशातील अन्य राज्यांत सोडाच म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर तेथील सैन्याने कारवाई करून त्यांना देशाबाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यावर मुंबईत आझाद मैदान येथे धर्मांधांनी दंगल करून महिला पोलिसांवर अत्याचार केले. हे एकप्रकारचे शक्तीप्रदर्शन करण्यासारखेच आहे, हे एव्हाना काही हिंदूंना तरी कळून चुकले आहे.

कमलेश तिवारी यांनी इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांचे वक्तव्य केवळ एकाच दैनिकात प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या वक्तव्याविषयी त्यांना शिक्षा होऊन ते जामीन मिळवून बाहेर आले होते, तरीही त्यांची हत्या करण्यात आली. या घटनांमधून धर्मांधांना हिंदूंचा काही ना काही निमित्त काढून जीव घ्यायचा आहे, हे स्पष्ट दिसून येते. एवढेच काय बांगलादेश येथे एका धर्मांधाने हिंदूंची कळ काढण्यासाठीच तेथील नवरात्रोत्सव मंडळाच्या मंडपात कुराण हे देवीच्या मूर्तीजवळ ठेवले. एवढ्या एका कारणावरून बांगलादेश येथे धर्मांधांनी नवरात्रोत्सव मंडप जाळले, हिंदूंची घरे, दुकाने जाळली, २० हून अधिक हिंदु महिलांवर सामूहिक बलात्कार केले, तर शेकडो हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. किती खुनशी प्रवृत्ती आहे ही ! ‘मूर्तीपूजक आणि हिंदू हे काफीर आहेत. काफिरांना ठार करण्याची आज्ञा आहे. काफिरांचे पैसे आणि स्त्रिया या आपल्यासाठीच आहेत’, ही शिकवण दिली जाते. अजमेर येथील एका मदरशात शिकलेल्या तरुणाने एका प्रसिद्ध वाहिनीवरील चर्चासत्रात ‘आम्हाला गझवा-ए-हिंद करून हिंदूंचे शीर धडावेगळे करण्याचे मदरशात शिकवले आहे. ते का शिकवण्यात येते ?’, असा प्रश्न विचारल्यावर आलेल्या विद्वान (?) मौलवींची बोलतीच बंद झाली.

हिंदूंचे संघटन आवश्यक !

दुसरीकडे हास्य कार्यक्रम आयोजित करणारा मुन्नवर फारूकी हा त्याच्या कार्यक्रमात हिंदु धर्मावर टीका करतो, त्यावर विनोद करतो; मात्र तरीही त्याचे कार्यक्रम बहुसंख्य हिंदूंच्या देशात आयोजित केले जातात. या कार्यक्रमांपैकी तुरळक कार्यक्रमांवर बहिष्कार घातला जातो, तरी फारूकी याला काही फरक पडत नाही. ३-४ वर्षांपूर्वी काही धर्मांधांनी फेसबूकवर छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हिंदूंच्या देवता यांच्याविषयी अवमानकारक लिखाण आणि चित्रे प्रसिद्ध केली होती. तेव्हा काही तूरळक हिंदूंनीच विरोध केला; मात्र संबंधित धर्मांधांचा शोध पोलिसांना घेता आला नाही. गुजरात येथील घटनेत जमेची गोष्ट म्हणजे एरव्ही धर्मांधांकडून विविध कारणांमुळे हिंदूंच्या हत्या होतात. त्यात ‘एका हिंदूची हत्या’ या पलीकडे घटनेची नोंद घेतली जात नाही. किसन यांच्याविषयी मात्र हिंदूंकडून सामाजिक माध्यमांमध्ये आणि प्रत्यक्ष अशा स्वरूपात उत्स्फूर्तपणे निषेध नोंदवला जात आहे. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ गुजरात येथे हिंदूंकडून मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले. तसेच सामाजिक माध्यमांद्वारे त्यांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक साहाय्य गोळा केले जात आहे. अवमानाच्या घटनेच्या संदर्भात सहिष्णु हिंदू वैध मार्गाने निषेध करत आहेत, हेही नसे थोडके. हिंदूंचे व्यापक आणि प्रभावी संघटनच हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान अन् त्यांच्यावरील आक्रमणेही रोखेल हे निश्चित !