सांताक्रूझ आणि पाळोळे येथून ५ लाख ३० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

गोव्यात अमली पदार्थ व्यवसायात आता स्थानिकांचाही सहभाग !

पणजी, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात अमली पदार्थविरोधी पथकाने सांताक्रूझ आणि पाळोळे, काणकोण अशा दोन ठिकाणी धाडी टाकून ५ लाख ३० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले. सांताक्रूझ येथे टाकलेल्या धाडीत १ लाख ६२ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले. या प्रकरणी प्रथमेश नाईक आणि जबीन वेलेंटिना या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांकडे ६२५ ग्रॅम गांजा आणि २० एल्एस्डी पेपर्स सापडले. दुसर्‍या प्रकरणात पाळोळे, काणकोण येथे टाकलेल्या धाडीत ३ लाख ६८ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले. या प्रकरणी कालीचरण नावाच्या तमिळनाडू येथील रहिवाशाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे गांजा हा अमली पदार्थ सापडला.