गोवा शासनाने जकात कायद्यात पालट करू नये !  दिगंबर कामत

दिगंबर कामत

पणजी, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – मद्यव्यवसायाला चालना देणे आणि फेणी या पारंपरिक पेयाचे व्यापारीकरण करणे यासाठी गोवा शासनाने जकात कायद्यात पालट करू नये, असे मत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘‘फेणी या पेयाला परंपरा आहे आणि ती बनवण्याची प्रक्रिया ही काजूच्या लिलावासमवेत राखून ठेवली पाहिजे.’’ गोव्यातील ‘ऑल गोवा कॅश्यू फेणी डिस्टीलर्स’ या संघटनेने जकात कायद्यात सुधारणा करण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. सुधारित कायद्यानुसार काजूचा लिलाव करणे बंद केले जाणार आहे.