मास्क न वापरल्यास असलेल्या दंडाच्या रकमेत गोव्यात दुप्पट वाढ

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २३ नोव्हेंबर (वार्ता.)-  गोव्यात येणार्‍या पर्यटकांनी मास्क घातला नाही, तर आजपासून २०० रुपये दंड आकारला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. यापूर्वी या दंडाची रक्कम १०० रुपये होती. ते म्हणाले, ‘‘पर्यटकांचे गोव्यात स्वागत आहे; परंतु त्यांनी कोविडविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. मार्गदर्शक तत्त्वे न पाळणार्‍यांच्या विरोधात कृती करण्याचे अधिकार पोलीस, मामलेदार, पंचायती आणि नगरपालिका यांना देण्यात आले आहेत. गोव्यात कोविडचा संसर्ग होऊ नये; म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.’’