Gyanvapi Case : ज्ञानवापीमध्ये खोदकाम करून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी हिंदु पक्ष न्यायालयाला विनंती करणार !

ज्ञानवापीचे सत्य काय आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणे हाच आमचा उद्देश आहे, असे हिंदु पक्षाचे म्हणणे आहे.

Swami Jitendranand Saraswati : जोपर्यंत हिंदूंना ज्ञानवापी मिळत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही ! – स्वामी जितेंद्रानंद सरस्वती

आतापासून ते दिवसाला केवळ सव्वा लीटर दुधाचे सेवन करणार आहेत.

Gyanvapi Survey : ज्ञानवापीच्या प्रकरणी भारतीय पुरातत्व विभागाचा अहवाल निर्णायक पुरावा नाही ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

बाबरीच्या वेळीही मुसलमान पक्षाने असाच दावा केला होता; मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाने तेथे केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालावरूनच तेथे पूर्वी मंदिर होते, हे मान्य करत हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, ही वस्तूस्थिती आहे !

Gyanvapi ASI Report : सरकारने ज्ञानवापीला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे ! – अधिवक्ता पू. हरि शंकर जैन

भारत सरकारने या प्रकरणी पुढील पावले उचलावीत आणि ते स्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे. तसेच संपूर्ण परिसर हिंदूंच्या हातात देण्याचा कायदा करावा. अयोध्येप्रमाणे येथेही मंदिर बांधले पाहिजे जेणेकरून पूजा प्रारंभ होईल.

GirirajSingh Appeals to Muslims : ज्ञानवापी मशीद हिंदूंच्या नियंत्रणात द्या !

हिंदु-मुसलमान बंधूभाव सिद्ध करण्याची संधी आता मुसलमान समाजाकडे चालून आली आहे. त्यांनी असे केल्यास मुसलमानांवर जगात सर्वत्र असलेला जिहाद करण्याचा डाग काही प्रमाणात तरी पुसला जाईल !

Pakistani Intervention India’s Gyanvapi Issue : (म्हणे) ‘भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांचे संरक्षण करा !’ – पाकिस्तान

भारताने संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार करत पाकिस्तान भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसत असल्यावरून कठोर शब्दांत समज देण्यास सांगितले पाहिजे !

ASI Survey : मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे ३२ पुरावे सापडले !  

न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पहाता मुसलमानांनी स्वतःहून ज्ञानवापी मशीद हिंदूंना सोपवावी आणि धर्मनिरपेक्षता, निधर्मीवाद, सर्वधर्मसमभाव दाखवून द्यावा !

ASI Report On Gyanvapi : ज्ञानवापीच्या जागी पूर्वी मोठे मंदिर होते !

ज्ञानवापीच्या जागी पूर्वी मोठे मंदिर होते, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात उघड झाले आहे.

ज्ञानवापीचा पुरातत्व सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक होणार !

वाराणसी येथील ज्ञानवापीच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही पक्षांना देण्याचे जिल्हा न्यायालयाने मान्य केले आहे. लवकरच याची प्रत त्यांना देण्यात येणार आहे. यामुळे हा अहवाल सार्वजनिक होऊ शकणार आहे.

Gyanvapi : ज्ञानवापी संकुलातील तळघराच्या चाव्या जिल्हाधिकार्‍यांकडे सोपवण्याचा न्यायालयाचा आदेश !

हिंदु पक्षाचे अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी सांगितले की, जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्‍वेश यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, ज्ञानवापी संकुलाच्या तळघराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.