वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीच्या आवारात खोदकाम करून पुरावे गोळा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल, असे हिंदु पक्षाकडून सांगण्यात आले आहे. ज्ञानवापीच्या सध्याच्या संरचनेला कोणत्याही प्रकारे हानी पोचणार नाही, अशा पद्धतीने हे उत्खनन करण्यात येणार आहे. ज्ञानवापीचे सत्य काय आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणे हाच आमचा उद्देश आहे, असे हिंदु पक्षाचे म्हणणे आहे. यापूर्वी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आधुनिक यंत्राद्वारे केलेल्या सर्वेक्षणातून येथे पूर्वी मोठे मंदिर असल्याचे उघड झाले आहे. आता येथील भूमीखाली उत्खनन करून अधिक पुरावे उघड होण्यासाठी हिंदु पक्षाने वरील मागणी केली आहे.
Hindu party to request the court to gather more evidence by carrying out excavation in #Gyanvapi !
ज्ञानवापी ।वाराणसी #GyanvapiCase#GyanvapiASIReport pic.twitter.com/cQYTmZi3O4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 28, 2024
सर्वेक्षणात ५५ मूर्ती आणि ९३ नाणी सापडली !
भारतीय पुरातत्व विभागाला सर्वेक्षणात ५५ मूर्ती सापडल्या. ज्ञानवापीच्या भिंतीसह अनेक ठिकाणी एकूण १५ शिवलिंगे आणि विविध काळातील ९३ नाणी सापडली आहेत. दगडी मूर्तीसमवेत विविध धातू आणि टेराकोटा यांसह घरगुती वापराच्या २५९ वस्तू सापडल्या. राम नाम लिहिलेला एक दगडही मिळाला आहे. मुख्य घुमटाखाली मौल्यवान पाचूच्या आकाराचा तुटलेला मौल्यवान धातू सापडला आहे. तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या तपासणीत काही अवशेष २ सहस्र वर्षे प्राचीन असल्याचे आढळून आले आहे.
सर्वेक्षण पथकात होता २ मुसलमानांचा सहभाग
ज्ञानवापीचे सर्वेक्षण करणार्या भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकामध्ये डॉ. इजहार आलम हाश्मी आणि डॉ. आफताब हुसेन या २ मुसलमान तज्ञांचाही समावेश होता. त्यांनी सर्वेक्षणानंतर सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे की, वैज्ञानिक अध्ययन, सर्वेक्षण, वास्तुशिल्प, अवशेषांचे अध्ययन, कलाकृती, शिलालेख, कला आणि मूर्तींचे सर्वेक्षण केल्यानंतर या ठिकाणी पूर्वी विशाल मंदिर असल्याचे स्पष्ट होत आहे.