Gyanvapi ASI Report : सरकारने ज्ञानवापीला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे ! – अधिवक्ता पू. हरि शंकर जैन

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

अयोध्या (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी प्रकरणावरील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अहवालावर या खटल्याचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन म्हणाले की, या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर एक मंदिर अस्तित्वात आहे.

भारत सरकारने या प्रकरणी पुढील पावले उचलावीत आणि ते स्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे. तसेच संपूर्ण परिसर हिंदूंच्या हातात देण्याचा कायदा करावा. अयोध्येप्रमाणे येथेही मंदिर बांधले पाहिजे जेणेकरून पूजा प्रारंभ होईल.