Swami Jitendranand Saraswati : जोपर्यंत हिंदूंना ज्ञानवापी मिळत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही ! – स्वामी जितेंद्रानंद सरस्वती

स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी घेतली प्रतिज्ञा !

स्वामी जितेंद्रानंद सरस्वती

वाराणसी (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय संघ समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी सांगितले आहे, ‘जोपर्यंत ज्ञानवापी हिंदूंना परत मिळत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही.’ आतापासून ते दिवसाला केवळ सव्वा लीटर दुधाचे सेवन करणार आहेत.

ज्ञानवापीच्या संदर्भातील भारतीय पुरातत्व विभागाचा अहवाल सार्वजनिक करण्याची न्यायालयाकडून अनुमती मिळाल्यानंतर हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत अहवाल उघड केला होता. त्यामध्ये नमूद केलेले सर्व पुरावे ज्ञानवापी हे मूलत: हिंदूंचे मंदिर असून ते पाडून तेथे मशीद उभारल्याची साक्ष देतात. त्यामुळे आता ज्ञानवापीही लवकरच हिंदूंच्या नियंत्रणात येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.