GirirajSingh Appeals to Muslims : ज्ञानवापी मशीद हिंदूंच्या नियंत्रणात द्या !

पुरातत्व विभागाच्या अहवालावरून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे मुसलमानांना आवाहन

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

नवी देहली : अयोध्येतील श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा नुकतीच झाली; परंतु आम्ही आधीपासून म्हणत होतो की, ‘अयोध्या तो झांकी है, काशी-मथुरा बाकी है !’ त्यामुळे आता काशीची वेळ आली आहे. पुरातत्व विभागाचा अहवाल जगासमोर आला असून मी मुसलमान बांधवांना विनंती करतो की, त्यांनी स्वत:हून मशीद हिंदूंच्या नियंत्रणात द्यावी. सर्व पुरावे हिंदूंच्या बाजूने आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे.

गेल्या ७५ वर्षांत पाकमध्ये एकही मंदिर शिल्लक ठेवले गेलेले नाही !

या वेळी सिंह म्हणाले की, मशीद हिंदूंना देऊन जातीय सलोखा राखण्यात साहाय्यही होईल. स्वातंत्र्यानंतर आम्ही एकाही मशिदीवर हातोडा चालवला नाही. असे असले, तरी याच ७५ वर्षांत पाकिस्तानात मात्र एकही हिंदु मंदिर शिल्लक ठेवले गेलेले नाही, हे आपण विसरता कामा नये. (भारतीय हिंदूंना इस्लामद्वेषी ठरवू पहाणार्‍या विदेशी प्रसारमाध्यमांना हे भारत सरकारनेच आता ठणकावून सांगितले पाहिजे ! – संपादक)

(सौजन्य : Republic Bharat)

… तर भारतीय युवक महाराणा प्रताप बनेल !

सिंह पुढे म्हणाले की, जर कुणी बाबर किंवा औरंगजेब बनण्याचा प्रयत्न करत असेल, तर भारतीय युवक महाराणा प्रताप यांच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही शांतता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी; कारण निर्णय आता तुम्हाला घ्यायचा  आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु-मुसलमान बंधूभाव सिद्ध करण्याची संधी आता मुसलमान समाजाकडे चालून आली आहे. त्यांनी असे केल्यास मुसलमानांवर जगात सर्वत्र असलेला जिहाद करण्याचा डाग काही प्रमाणात तरी पुसला जाईल !
  • हिंदूंना नेहमीच सर्वधर्मसमभावाचा डोस पाजणारे काँग्रेसवाले ज्ञानवापीच्या प्रकरणी चकार शब्दही काढत नाहीत, हे जाणा !