|

पुणे – काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या २ मंदिरांच्या जागेवर छोटा शेख अन् बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत. या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभारला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री. अजय शिंदे यांनी केली. याविषयी श्री. शिंदे यांनी महानगरपालिका आणि पुरातत्व विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

"पुण्यातील बडा शेख, छोटा शेख दर्गा म्हणजे पुण्येश्वर-नारायणेश्वराची मंदिरं", मनसेच्या दाव्याने नवा वादhttps://t.co/NtBTpRmnlk#Pune #MNS #AjayShinde @mnsadhikrut
— LoksattaLive (@LoksattaLive) May 23, 2022
श्री. अजय शिंदे पुढे म्हणाले,
‘‘पुण्येश्वराला पण तेवढाच मोठा इतिहास आहे. अल्लाउद्दीन खिलजीचा एक सरदार बडा अरब पुण्यावर चाल करून आला. त्या वेळी त्याने भगवान शंकराचे मंदिर उद्ध्वस्त केले. आधी अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतरच्या काळात औरंगजेब याने पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही २ मंदिरे उद्ध्वस्त केली. त्या ठिकाणी दर्गे बांधण्यात आले. कसबा पेठेत कुंभारवाड्यात असलेल्या पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर सध्या ‘छोटा शेख’ नावाने दर्गा बांधण्यात आला आहे. या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाच्या नातवाची कबरही आहे. दुसरा दर्गा शनिवारवाड्यासमोर नारायणेश्वर मंदिर पाडून बांधण्यात आला आहे. कुंभारवाड्यातील मंदिराच्या जागेवर बांधण्यात आलेल्या दर्ग्याला ‘छोटा शेख दर्गा’, तर नारायणेश्वराच्या जागेवर बांधण्यात आलेल्या दर्ग्याला ‘बडा शेख दर्गा’ असे नाव देण्यात आले आहे. दोन्ही मंदिरांच्या मुक्तीसाठी पुष्कळ आधीपासून मी काम करत आहे.’’
संपादकीय भूमिकाइस्लामी आक्रमकांनी हिंदूंची सहस्रो मंदिरे पाडून त्या जागी त्यांची प्रार्थनास्थळे बांधली असल्याचा इतिहास आहे. असे असतांना एकेक हिंदुत्वनिष्ठ किंवा संघटना यांना या इस्लामी अतिक्रमणांची माहिती देऊन मंदिरे मुक्त करण्याची मागणी करावी लागण्यापेक्षा केंद्र सरकारने देश पातळीवर एक कायदा करून अशी मंदिरे मुक्त करण्यासाठी पावले उचलणे अधिक सयुक्तिक ठरेल. तशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे ! |
संपादकीय : ‘तत्त्व’ विसरलेला पुरातत्त्व विभाग !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’