ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळले, त्याप्रमाणे गोव्यातही आढळू शकते ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

वर्ष १५१० नंतर पाडण्यात आलेल्या धार्मिक स्थळांची भारतीय पुरात्व खाते आणि गोवा पुरातत्व खाते यांनी एकत्रितपणे सर्वेक्षण करण्याची मागणी

सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

पणजी, १७ मे (वार्ता.) – उत्तरप्रदेशमधील ज्ञानवापी मशिदीमध्ये ज्याप्रमाणे शिवलिंग आढळून आले आहे, तशाच प्रकारे गोव्यातही शिवलिंग आढळू शकते. यासाठी पुरातत्व खात्याने आवश्यक ते सर्वेक्षण करावे, अशी मागणी वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले,

‘‘वर्ष १५१० नंतर गोव्यातील जी मोठी मंदिरे आणि धार्मिक स्थळे पाडली गेली, त्यांचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणीही शिवलिंग सापडण्याची शक्यता आहे. मंदिर आणि धार्मिक स्थळे यांचे भारतीय पुरातत्व खाते आणि गोवा पुरातत्व खाते यांनी एकत्रितपणे सर्वेक्षण करावे. ‘पोर्तुगीज काळात जी मंदिरे लुप्त झाली होती, त्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ही मंदिरे पुन्हा उभारावी, असे केवळ माझे वैयक्तिक मत नसून सर्वांचीच तशी भावना आहे.’’