पर्यटकांना औरंगजेबाच्या थडग्याला ५ दिवस देता येणार नाही भेट !

पुरातत्व विभागाचा निर्णय !

क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे

संभाजीनगर – जिल्ह्यातील खुलताबाद येथील क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे असून त्याला ५ दिवस भेट देता येणार नाही, असा निर्णय पुरातत्व विभागाने १९ मे या दिवशी घेतला. ‘एम्.आय.एम्.’चे तेलंगाणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी १२ मे या दिवशी औरंगजेबाच्या थडग्याचे दर्शन घेतले होते.

त्यानंतर शिवसेना, भाजप आणि मनसे यांसह इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. ‘क्रूरकर्मा औरंगजेबानेे महाराष्ट्राची एवढी हानी केल्यानंतरही त्याच्या थडग्यासमोर कुणी नतमस्तक कसे होऊ शकते ?’, असा प्रश्‍न करत ओवैसी यांच्या कृत्याचा निषेध केला गेला. यावरून भाजप आणि मनसेने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचाही प्रयत्न केला. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही आक्रमक प्रतिक्रिया दिल्याने प्रशासनाने थडग्याला भेट देण्यावर ५ दिवस बंदी आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे थडग्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

२ दिवसांपूर्वीच स्थानिक नागरिकांनी स्वतःहून थडग्याला भेट देण्याचा प्रकार बंद करण्याचा आग्रह धरला होता. थडग्याला काही अज्ञातांकडून धोका असल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते; मात्र त्याच वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिसरातील वातावरण शांत केले.

संपादकीय भूमिका

केवळ ५ दिवसच कशाला ? क्रूरकर्म्याच्या थडग्याला भेट देण्याचा प्रकार कायमचाच बंद करा !