देहलीतील जामा मशिदीच्या पायर्‍यांखाली हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती असून त्या बाहेर काढाव्यात !

हिंदु महासभेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागणी

हिंदु महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी (उजवीकडे)

नवी देहली – देहलीतील जामा मशिदीच्या पायर्‍यांखाली हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती पुरल्या आहेत. त्यामुळे या जागेचे खोदकाम करून त्या मूर्ती बाहेर काढण्यात याव्यात, जेणेकरून त्यांची पूजा केली जाऊ शकते, अशी मागणी हिंदु महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून केली आहे. तसेच या पत्रात त्यांनी जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.

हिंदु महासभेने पंतप्रधान मोदीजींना लिहिलेले पत्र

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

हिंदु महासभेने पत्रात इतिहासातील घटनांचा उल्लेख केला आहे. यात म्हटले आहे की, औरंगजेबच्या दरबारातील इतिहासकार शाही मुस्ताक यांनी वर्ष १७१० मध्ये लिहिलेल्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला होता. खानजहां बहादुरने जोधपूरमधील हिंदूंच्या मंदिरांमध्ये लूटमार केली. शेकडो वाहनांमध्ये ही संपत्ती भरून तो औरंगजेबसमोर आला. त्यावेळी औरंगजेबाने त्याच्यावर खुश होऊन त्यातील मौल्यवान वस्तू स्वतःच्या तिजोरीत ठेवण्याचा आदेश दिला आणि हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती देहलीतील जामा मशिदीच्या पायर्‍यांखाली पुरून टाकण्यास सांगितले.

जामा मशिदीखाली विष्णु मंदिर ! – खासदार साक्षी महाराज

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी जामा मशिदीखाली हिंदु मंदिर असल्याचा दावा केला आहे.

 (सौजन्य : Hapur Hulchul Uttar Pradesh)

ते म्हणाले की, यमुना नदी किनारी भगवान विष्णूचे मंदिर होते. वर्ष २००९ पासून म्हणजे जेव्हा मी आमदार होतो, तेव्हापासूनच मी हे वेळोवेळी सांगत आलो आहे.

संपादकीय भूमिका

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये ! भारतात इस्लामी आक्रमकांनी सहस्रो ठिकाणी हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या. याविषयी ऐतिहासिक पुरावेही उपलब्ध आहेत. आता हिंदूंमध्ये जागृती होऊ लागल्याने ‘ही धार्मिक स्थळे परत मिळावीत’, अशी मागणी ते करू लागले आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारनेच या सर्व वास्तू हिंदूंना परत मिळण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !