इस्रायली पंतप्रधान बेनेट यांचा एप्रिलमध्ये भारत दौरा !

पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असून यामध्ये रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे पालटत असलेली भूराजकीय समीकरणे, तसेच उभय देशांमधील संबंधांना नव्या स्तरांवर घेऊन जाण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलणे, हा या दौर्‍याचा उद्देश असेल.

गेल्या २ वर्षांत २० मार्च या दिवशी देशभरात कोरोनाचे सर्वांत अल्प नवे रुग्ण !

देशभरात आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या असून चौथी लाट लवकरच येईल, अशी चर्चा होत असतांना सध्यातरी परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आहे.

भारताचा ‘आर्क्टिक परिषदे’चा स्थायी सदस्य बनण्याचा प्रयत्न !

‘आर्क्टिक परिषदे’चा सदस्य बनल्यामुळे आर्क्टिक क्षेत्राचा भारताच्या हवामानावर होत असलेला परिणाम चांगल्याप्रकारे अभ्यासता येईल.

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

काश्मिरी हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांविषयी शंका उपस्थित करणार्‍या तस्लिमा नसरीन यांनी आधी पूर्ण इतिहास जाणून घेऊन मत व्यक्त करावे. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांवर असा अविश्‍वास व्यक्त करणे, हे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच !

(म्हणे) ‘मिशनरी शाळांमध्ये आमच्याकडून ‘बायबल’ वाचनाची अपेक्षा करण्यात आली नाही !’ – साकेत गोखले, तृणमूल काँग्रेस

मिशनरी शाळांविषयी पुळका असलेल्या गोखले यांना चांगलेच ठाऊक असेल की, हिंदु विद्यार्थिनींना बांगड्या घालणे, कुंकू लावणे, मेंदी काढणे आदी धार्मिक कृती करण्यापासून रोखले जाते. हा नियम विद्यार्थिनींचा निवडण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा नव्हे का ?

लाच घेतल्याच्या प्रकरणी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचे प्राध्यापक महंमद खालिद मोइन यांना अटक

प्राध्यापक महंमद खालिद मोइन हे अनेक खासगी बांधकाम व्यावसायिक, वास्तूविशारद आणि दलाल यांच्या संगनमताने विविध प्रकारच्या फसवणुकीच्या कारवायांमध्ये गुंतले होते. लाच घेऊन ते विविध बांधकाम प्रकल्पांना बनावट प्रमाणपत्र देत होते.

योगी आदित्यनाथ हे हिंदु राष्ट्रातील प्रथम पंतप्रधान असतील !

मुख्यमंत्रीपदाच्या मागील कार्यकाळात त्यांच्यावर कोणताही डाग नाही. त्यांनी ज्याप्रकारे काम केले आहे, त्यावरून येणार्‍या काळात ते देशाची सूत्रे सांभाळतील, हे लक्षात येते. ते पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार आहेत आणि एक दिवस देशाचे पंतप्रधान बनतील, असे भविष्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून भारताच्या केंद्रीय मंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना रुग्णसंख्या वाढण्याविषयी सतर्कता, संसर्गावर बारीक लक्ष ठेवणे आणि अधिकाधिक ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ तपासणी करण्यास सांगितले आहे.

‘द कश्मीर फाइल्स’च्या ‘विकिपीडिया’वरील पानाची साम्यवादी विचारसरणीच्या संपादकांकडून छेडछाड !

हिंदुद्वेष्ट्या साम्यवाद्यांची मजल कोणकोणत्या स्तरापर्यंत गेली आहे, याचे हे एक उदाहरण ! जर हिंदूंनी ‘द कश्मीर फाइल्स’ पाहून त्यातून काही बोध घेतला नाही, तर त्यांचा विनाश निश्‍चित आहे, हे हिंदू कधी लक्षात घेणार ?

माझ्या सांगण्यावरून खासदारांच्या मुलांना उमेदवारी नाकारली ! – पंतप्रधान मोदी यांची घराणेशाहीवर टीका

पक्षात घराणेशाही चालणार नाही. भाजपच्या नेत्याच्या आणि खासदाराच्या कुटुंबियांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्यास तो निर्णय माझ्या सांगण्यावरून झाला आहे. जर हे पाप असेल, तर ते मी केले आहे.