जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ५ वर्षांत ३४ हिंदूंच्या हत्या !

गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये ३४ हिंदूंच्या हत्या झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली.

दक्षिण देहलीमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये मांस विक्रीची दुकाने बंद ठेवणार ! – महापौर मुकेश सूर्यन्

दक्षिण देहलीचे महापौर मुकेश सूर्यन् यांनी ‘चैत्र नवरात्रीमध्ये शहरात मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाची कठोरपणे कार्यवाही करणार’, असे म्हटले आहे. ‘आम्हाला आलेल्या तक्रारींनंतर आम्ही हा आदेश दिला आहे.

‘प्रसाद योजने’अंतर्गत सोलापुरातील प्राचीन मंदिरांचा समावेश करावा !

सोलापूर जिल्हा हा आध्यात्मिक तीर्थस्थळांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे; परंतु अद्याप सोलापुरातील एकही प्राचीन मंदिराचा समावेश या योजनेत नाही. त्यामुळे प्राचीन मंदिराच्या विकासासाठी प्रसाद योजनेत समावेश करावा.

५० वर्षे जुना आसाम-मेघालय सीमावाद संपुष्टात !

आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये गेल्या ५० वर्षांपासून चालू  असलेला सीमावाद अंततः संपुष्टात आला. येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्यात करार झाला.

देशातील सर्व टोल नाके हटवणार ! – नितीन गडकरी

टोल वसूल करण्यासाठी जी.पी.एस्. आधारित ‘ट्रॅकिंग सिस्टम’ सिद्ध केली जात आहे. यात टोल नाका पार केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून टोलची रक्कम आपोआप कापली जाणार आहे.

१ एप्रिलपासून भविष्य निर्वाहनिधी, पोस्ट ऑफिसच्या योजना, जी.एस्.टी. आदींच्या नियमांत होणार महत्त्वपूर्ण पालट !

१ एप्रिलपासून भविष्य निर्वाहनिधीच्या खात्यावर कर आकारला जाईल. अडीच लाख रुपयांपर्यंत कर नसेल, तर सरकारी कर्मचार्‍यांसाठी ही मर्यादा ५ लाखांची असेल.

पंतप्रधान मोदी यांच्या जीवनातील प्रसंगांचे कथन करणार्‍या संकेतस्थळाचे अनावरण !

असेच प्रसंग कुणाच्या जीवनात घडले असल्यास त्यांनीही याची माहिती पाठवावी, असे आवाहनही या संकेतस्थळाने केले आहे. काही स्वयंसेवकांच्या पुढाकाराने हे संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे.

युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढणे, हे सरकारच्या नियंत्रणाबाहेर ! – केंद्र सरकार

देशासाठी लागत असलेल्या इंधनातील ८० टक्के भाग आयात करावा लागतो. त्या दृष्टीने देशाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

३१ मार्चपासून देशात कोरोनाचे निर्बंध रहित होणार ! – केंद्र सरकार

कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र मुखपट्टी (मास्क) आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे नियम कायम असणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

‘विश्व अग्निहोत्र दिन’ आणि ‘होळी’ यांच्या निमित्ताने आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या कार्यक्रमातील जिज्ञासूनी सांगितले की, त्या प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ त्यांच्या दुकानामध्ये अग्निहोत्र करतात. त्यामुळे ग्राहकांनाही त्यांच्या दुकानामध्ये चैतन्याची अनुभूती येते !