केंद्र सरकारला ‘पूजास्थळ कायद्या’सारखे कायदे करण्याचा अधिकार नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय

तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेला हा हिंदूविरोधी कायदा रहित करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कृती करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

‘मदरसा’ शब्दाचे अस्तित्व आता संपुष्टात आले पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

भाजपशासित अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही अशी रोखठोक भूमिका घेऊन खर्‍या अर्थाने विकास साधला पाहिजे !

‘इकॉनॉमिक्स टाइम्स’कडून शिवलिंगाचा अवमान करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध

भारतात देवतांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा नसल्याने सातत्याने हिंदूंच्या देवतांचा असा अवमान केला जातो आणि कुणालाही शिक्षा होत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

जेव्हा कोणताही मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा भूमी थरथरते !

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी २१ मे या दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्वीट करून त्यांना आदरांजली वाहिली. या ट्वीटमध्ये त्यांनी राजीव गांधी यांचे ‘जेव्हा कोणताही मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा भूमी थरथरते’, असे वाक्य लिहिले. नंतर त्यांनी हे ट्वीट हटवले.

राष्ट्रध्वजावर उभे राहून नमाजपठण करणारा अझीझ पोलिसांच्या कह्यात !

येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबई येथून आलेल्या महंमद तारिक अझीझ नावाच्या व्यक्तीने भारतीय राष्ट्रध्वज भूमीवर अंथरून त्यावर उभे राहून नमाजपठण केल्याने त्याला कह्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधा ! – भाजपचे नेते आफताब आडवाणी

आज जे काही होत आहे, ते सर्व औरंगजेबामुळे होत आहे. औरंगजेबाने लाखो हिंदूंची हत्या केली आणि लुटमार केली. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे असणार्‍या औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधण्यात आले पाहिजे

धार्मिक स्थळाचे स्वरूप ठरवण्याच्या प्रयत्नास प्रतिबंध करता येत नाही !

मंदिरांच्या ठिकाणी मशिदी बांधल्याच्या वक्तव्यांना विरोध करण्याचा प्रयत्न मुसलमान पक्षाकडून केला जात आहे, त्याला यामुळे चाप बसला आहे ! हिंदूंनी आता त्या सहस्रो धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणाची मागणी केली पाहिजे जी मूळची हिंदूंची आहेत !

हिंदूंनी ज्ञानवापी कह्यात घ्यावी ! – तस्लिमा नसरीन

देश-विदेशातील किती मुसलमान सत्य इतिहास मान्य करून असे सांगण्याचे धाडस करत आहेत ? या प्रश्नाचे ‘एकही नाही’, असेच उत्तर मिळते ! याचाच अर्थ धर्मनिरपेक्षता आणि अन्य धर्मांचा आदर केवळ हिंदूंनी करायचा अन् अन्यांनी हिंदूंवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर आघात करायचे असाच होतो, हे हिंदू आतातरी लक्षात घेतील का ?

दुचाकी चालवतांना ‘हेल्मेट’ घातल्यावरही होऊ शकतो दंड !

या जोडीलाच वाहन ‘ओव्हरलोडेड’, म्हणजे अतिरिक्त भार वाहून नेत असेल, तर चालकाला २० सहस्र रुपये एवढा दंडही होऊ शकतो. यासह चालकाला प्रति टन २ सहस्र रुपयांचा अतिरिक्त दंडही भरावा लागू शकतो.

ज्ञानवापी मशीद नसून मंदिर आहे !

औरंगजेबाने काशी विश्‍वेश्‍वर मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद उभी केली; मात्र ते तेथील धार्मिक स्वरूप पालटू शकले नाहीत; कारण तेथे शृंगारगौरी, भगवान श्री गणेश आणि अन्य हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आजही आहेत. त्यामुळे ही जागा मशीद नाही, अशी माहिती हिंदु पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.