देशात ५०० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाण १०१.९ टक्क्यांनी वाढले !

२००० रुपयांच्या बोगस नोटा ५४.१६ टक्क्यांनी वाढल्या !

नवी देहली – देशात वर्ष २०२१-२२ मध्ये बोगस नोटांचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या अहवालात देण्यात आली आहे. ५०० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाण तब्बल १०१.९ टक्क्यांनी वाढले आहे. यासह २००० रुपयांच्या नोटांचे प्रमाण ५४.१६ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १०, २०, आणि २०० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाण अनुक्रमे १६.४ टक्के, १६.५ टक्के अन् ११.७ टक्के इतके वाढले आहे. ५० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाण २८.७ टक्क्यांनी, तर १०० रुपयांच्या बोगस नोटा १६.७ टक्क्यांनी न्यून झाल्या आहेत. चलनात असलेल्या बोगस नोटांचे प्रमाण वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी घोषित केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधी पक्षांकडून आजही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

संपादकीय भूमिका

बोगस नोटा रोखण्यासाठी नोटाबंदी करूनही जर बोगस नोटा वाढत असतील, तर याला सुरक्षायंत्रणाच उत्तरदायी आहेत !