नवी देहली – वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात ८.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रत्यक्षात केंद्रशासनाने उत्पादनाचा आकडा हा ८.९ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता; परंतु कोरोनाची तिसरी लाट, तसेच जागतिक महागाई यांमुळे उत्पादनाने हा आकडा गाठला नाही. वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन ७.३ टक्के होते. या वर्षातील शेवटच्या तिमाहीत ४.१ टक्क्यांनी उत्पादन वाढल्याची माहिती केंद्रशासनाच्या राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने दिली आहे. दुसरीकडे देशाची वित्तीय तूट ही सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ६.७१ टक्के राहिली.