सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे, मनमिळाऊ आणि साधकांना आधार वाटणारे पनवेल येथील कै. प्रभाकर प्रभुदेसाई (वय ८१ वर्षे) !

प्रभुदेसाईकाकांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना मला त्यांचा चेहरा निरागस दिसला. मला त्यांच्या चेहर्‍यावर तेज जाणवत होते. ‘ते शांत झोपले आहेत’, असेच मला जाणवत होते.

प.पू. भक्तराज महाराज यांचे नारायणगाव येथील शिष्य शशिकांत मनोहर ठुसे (वय ८१ वर्षे ) यांचे निधन !

सनातन परिवार ठुसे आणि मरकळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ३० नोव्हेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता मीनानदी तीरावर हरिस्वामी मंदिराजवळ त्यांचे अंत्यविधी होणार आहेत. 

रुग्‍णाईत असूनही सतत सकारात्‍मक रहाणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असणारे अकोला येथील (कै.) मधुकर काशीराम रेवेकर (वय ६४ वर्षे)!

बाबा शुद्धीवर आले आणि म्‍हणाले, ‘‘आईला कळवू नका. मी आता बरा आहे. गुरुमाऊली सतत माझ्‍या समवेत आहेत.’’ असे बर्‍याच प्रसंगांत बाबा नेहमी सकारात्‍मक रहायचे.   

उपासमार आणि मानसिक तणाव यांमुळे देवमाशाच्या पिल्लाचा मृत्यू

देवमाशाचे पिल्लू कार्यक्षेत्राबाहेर किंवा कळपाबाहेर गेले, तर सैरभैर होतात. त्यांच्यावर मानसिक ताण येतो. कधी कधी या मानसिक ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटकाही येतो.

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन

२७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात २ मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

‘वाघ बकरी चाय’ आस्थापनाच्या कार्यकारी संचालकांचे निधन 

‘वाघ बकरी चाय’चे कार्यकारी संचालक पराग देसाई (वय ४९ वर्षे) यांचे निधन झाले. गेल्या आठवड्यात कर्णावती येथे मॉर्निंग वॉकच्या वेळेला भटक्या कुत्र्यांनी त्यांवर आक्रमण केले. यात स्वतःचा बचाव करतांना ते पाय घसरून खाली पडले. डोक्याला दुखापत झाल्याने ब्रेन हॅमरेज झाले.

देवरुख येथील आध्यात्मिक गुरु  श्री. अजित तेलंग (वय ७१ वर्षे) स्वामीचरणी विलीन

भारत शासनाच्या ‘आयुषमान भारत’ या प्रकल्पांअंतर्गत श्री. अजित तेलंग यांनी गुजरात येथे रेकि विद्यानिकेतनद्वारे १ सहस्र ६०० हून अधिक वैद्यकीय अधिकार्‍यांना रेकिचे प्रशिक्षण दिले.

बेंगळुरूत फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू  

दसरा आणि दिवाळी यांसाठी फटाक्यांची साठवणूक करण्यात येत होती. वाहनातून खोकी उतरवत असतांना त्यांना आग लागली. काही वेळातच दुकान आणि गोदाम यांना आगीने वेढले.

नाशिक येथील संत पू. यशोदा गंगाधर नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांचा देहत्याग !

‘सगळीकडे देव आहे’, असे पू. आजी सांगत असत. पू.आजी सदैव देवाच्या अनुसंधानात असत. त्यांच्या हातात कायम जपमाळ असे.सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर त्यांची श्रद्धा होती.

महाराष्ट्रात वर्ष २०२२-२३ मध्ये १३ सहस्र ६५३ नवजात बालकांचा मृत्यू !

प्रत्येक दिवसाला ३१ बालकांचा, तर प्रत्येक ३९ व्या मिनिटाला एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे.