कडेगाव (सांगली) येथील प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांचे निधन !

कडेगाव-पलूस, जिल्‍हा सांगली येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख (वय ४४ वर्षे) यांचे अल्‍पशा आजाराने निधन झाले. सनातन संस्‍थेच्‍या मलकापूर येथील साधिका सौ. कांतावती देशमुख यांचे ते ज्‍येष्‍ठ चिरंजीव होते.

महाराष्ट्रात कार्यान्वित न झालेले ४५ ‘ट्रॉमा केअर सेंटर’ तातडीने चालू करा !

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि औद्योगिक केंद्र असणार्‍या माणगावातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू झालेले नाही.

ज्‍येष्‍ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

सीमा देव यांचे पुत्र प्रसिद्ध अभिनेते अजिंक्‍य देव यांनी वर्ष २०२० मध्‍ये सीमा देव या ‘अल्‍झायमर्स’ या आजाराने ग्रस्‍त होत्‍या. सीमा देव आणि त्‍यांचे दिवंगत यजमान अभिनेते रमेश देव यांनी ‘आनंद’ या चित्रपटात केलेली भूमिका विशेष गाजली.

मथुरा येथे माकडांच्या झुंजीमुळे घराचा भाग कोसळून ५ जण मृत्यूमुखी  

अपघातानंतर वृंदावनच्या या भागातील ढिगारा हटवला आणि ढिगार्‍याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. वृंदावनचे बांके बिहारी मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे.

ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक आणि कवी नामदेव धोंडो महानोर यांचे निधन !

‘अजिंठा’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’, ‘जगाला प्रेम अर्पावे’, ‘दिवेलागणीची वेळ’ हे त्‍यांचे कवितासंग्रह लोकप्रिय ठरले. यासह ‘गपसप’, ‘गावातल्‍या गोष्‍टी’ हे कथासंग्रहही वाचकांना आवडले.

नितीन देसाई यांच्या मृत्यूची राज्य शासनाकडून चौकशी होणार !

प्रसिद्ध मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली असली, तरी हा मृत्यू आधुनिक सावकारी पद्धतीच्या कर्जवसुलीच्या पद्धतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करत चौकशी करण्याची मागणी केली.

यवतमाळ येथे महामार्गावर भीषण अपघात !

नागपूर – तुळजापूर राष्‍ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करणार्‍या महामार्ग पोलिसांच्‍या वाहनाला आयशर ट्रकने जोरदार धडक दिली.

कर्करोगाला धीरोदात्तपणे सामोरे जाणार्‍या सनातनच्‍या साधिका वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांचे निधन !

वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव या आयुर्वेदात एम्.डी. होत्‍या. त्‍या धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात साहाय्‍यक प्राध्‍यापिका म्‍हणून ५ वर्षांपासून कार्यरत होत्‍या.

रा.स्व. संघाचे माजी सह-सर कार्यवाह मदनदास देवी यांचे निधन !

मदनदास देवी हे जवळपास ६ दशके रा.स्व. संघाचे प्रचारक होते. त्यांनी संघाचे सह सरकार्यवाह म्हणूनही काम पहिले होते. मदनदास देवी यांनी संघ आणि भाजप यांच्यात समन्वयक म्हणून काम केले होते.

विसापूर (दापोली) येथे वृद्धेचा खून करून सोन्याची माळ चोरली : १२ घंट्यांत महिला आरोपीला पोलिसांनी केली अटक

दीपावती घाग या आजारी होत्या. त्या घरी एकट्याच रहात होत्या. त्यांचा खून झाला आहे. या घटनेत ७८ सहस्र रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरून नेल्याचे समोर आले आहे.