सातारा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुभाष महाराज घाडगे यांचे देहावसान !

ह.भ.प. सुभाष महाराज घाडगे

सातारा : येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुभाष महाराज घाडगे (वय ६१ वर्षे) यांचे ८ एप्रिल या दिवशी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माण (जिल्हा सातारा) येथे रहात होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांनी ‘सेवा सूर्य गुरुकुलम् आश्रमा’च्या माध्यमातून अनाथ लहान मुलांचे संगोपन केले. आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्था त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालत होती. सनातन परिवार घाडगे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

ह.भ.प. सुभाष महाराज सनातन संस्थेशी गेल्या २० वर्षांपासून जोडलेले होते. ते कीर्तनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती आणि धर्मशिक्षण यांविषयीची माहिती १५ मिनिटे उपस्थितांना सांगायचे. त्यांनी याआधी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमालाही भेट दिली होती.