रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

‘आतापर्यंत आपण कीर्तनकार सदानंद भस्मे महाराज यांना ‘कीर्तनकार’ म्हणून ओळखत होतो. आजपासून आपण त्यांना ‘संत भस्मे महाराज’ असे म्हणणार आहोत. अशा प्रकारे एका कीर्तनकाराला ‘संत’ म्हणून घोषित करण्याचा सनातन संस्थेच्या इतिहासातील हा पहिलाच अद्वितीय क्षण आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

प.पू. दास महाराज आणि रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांच्यात झालेले वैशिष्ट्यपूर्ण संभाषण

प.पू. दास महाराज आणि रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांच्यात भ्रमणभाषद्वारे झालेले वैशिष्ट्यपूर्ण संभाषण पुढे दिले आहे.

५८ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. भार्गवी सरमळकर (वय ८ वर्षे) !

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. भार्गवी सीमित सरमळकर हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

साधनेच्या बळावर आपत्काळाला सहजतेने सामोर्‍या जाणार्‍या पू. माई !

‘प.पू. दास महाराज सूक्ष्मातील वाईट शक्तींशी लढा देण्यासाठी रामनाथी आश्रमात गेले आहेत, तर पू. (सौ.) माई स्थूल देहाने आश्रमातील नित्यक्रम करत असतात आणि सूक्ष्म देहाने श्रीगुरुचरणी लीन होऊन साधना करतात’, असे आम्हाला जाणवते.