प.पू. दास महाराज यांना मिळालेले ‘मारुतीचे चित्र’ आणि ‘प.प. श्रीधरस्वामी यांचे छायाचित्र’ यांच्याकडे पाहून ‘काय जाणवते ?’, हा प्रयोग करतांना साधकांना आलेल्या अनुभूती
‘वर्ष १९६३ मध्ये प.पू. दास महाराज साधनेसाठी हिमालयातील मानससरोवर येथे गेले असताना तिथे त्यांना मारुतिभक्त असलेले एक संत भेटले. त्या संतांना मारुतिरायाचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. त्यांनी मारुतिरायाचे रूप हाताने रेखाटून ते चित्र प.पू. दास महाराजांना भेट स्वरूपात दिले.