श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त प.पू. दास महाराज यांना स्फुरलेली शुभेच्छारूपी शब्दसुमने !

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

परम श्रद्धेय परात्पर गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना नमस्कार !

प.पू. दास महाराज

आपला वाढदिवस झाला. (१४.१२.२०२४ या दिवशी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस झाला.) त्यानिमित्त माझ्या अंतःकरणातून स्फुरलेली शुभेच्छारूपी शब्दसुमने अर्पण करतो.

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

वैज्ञानिक युगात मानवजात तंत्रज्ञानाची भाषा बोलत आणि त्याप्रमाणे वागत असतांना आपण गुरूंच्या मनातील विचार जाणून भारत अन् भारताबाहेरील अमूल्य आध्यात्मिक ठेवा जोपासण्याचे महान कार्य हाती घेतले आणि त्याचा नित्य ध्यास घेऊन अध्यात्माचा अनमोल ठेवा आम्हा साधकांपर्यंत पोचवला. देशभरातील दैवी शक्ती आणि त्यांच्या कार्याची ओळख आम्हा साधकांना घरबसल्या झाली. भारत देशातील अमूल्य असा दैवी ठेवा पाहून आम्ही कृतार्थ झालो.

‘आम्हाला असेच आध्यात्मिक स्थळांशी जोडून तेथील चैतन्याचा ठेवा आम्हा साधकांपर्यंत पोचवून आम्हालाही मोक्षमार्गाने घेऊन जावे’, अशी मी प्रार्थना करतो.

‘जाणूनी श्रींचे मनोरथ’ या उक्तीप्रमाणे आपले महान कार्य असेच चालू राहो’, हीच प.प. श्रीधरस्वामी महाराज आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो.

– श्री. रघुवीर नाईक (प.पू. दास महाराज) आणि पू. (सौ.) माई नाईक, बांदा, पानवळ, सिंधुदुर्ग. (१४.१२.२०२४)