५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली जळगाव येथील चि. दिविशा दीपक चौधरी (वय १ वर्ष ) !
आम्ही दिविशाला घेऊन जळगाव सेवाकेंद्रात अन्नप्राशन विधीसाठी गेल्यावर ती ध्यानमंदिरातील प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकडे एकटक पहात होती. तिला खाली बसवले होते. तेव्हा ती डोके वर करून हात हलवत होती. ती ‘प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे हात करून हातानेच इकडे या’, अशी खूण करून त्यांना बोलवत आहे’, असे मला जाणवत होते.