संतांप्रती भाव असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कर्नाटक येथील चि. रूपश्री शशीधर गौडा (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. रूपश्री शशीधर गौडा ही या पिढीतील एक आहे !

‘पौष कृष्ण अष्टमी (२२.१.२०२५) या दिवशी चि. रूपश्री शशीधर गौडा हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

चि. रूपश्री शशीधर गौडा हिला  तिसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

चि. रूपश्री गौडा

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. जन्म ते १ वर्ष 

१ अ. ‘चि. रूपश्री जन्मापासूनच अतिशय शांत स्वभावाची आहे.

१ आ. सात्त्विकतेची ओढ 

१. आम्ही कौटुंबिक कार्यक्रमाला गेल्यावर ती पुष्कळ रडत असे; मात्र गुरुपौर्णिमेच्या वेळी ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत सभागृहात न रडता शांत रहात असे. साधक आमच्या घरी आल्यास ती साधकांना ओळखते आणि लगेच त्यांच्याकडे जाते. तिला साधकांचा सहवास आवडतो. तिला अन्य ठिकाणी जाऊन आल्यावर त्रास होतो आणि ती रडू लागते.

सौ. लिखिता गौडा

२. ती ४ मासांची असतांना तिला ‘नमस्कार कसा करायचा ?’, हे शिकवल्यावर ती आजी-आजोबांना नमस्कार करू लागली.

१ इ. देवाची आवड : ती आमच्या घरातील श्रीकृष्णाच्या चित्राला नमस्कार करते. तिला देवळात जाणे, भजन आणि आरती करणे पुष्कळ आवडते.

१ ई. सत्संग आवडीने ऐकणे : ज्ञानशक्ती प्रसार अभियान चालू असतांना पू. रमानंदअण्णा (पू. रमानंद गौडा, सनातनचे ७५ वे (समष्टी) संत, वय ४८ वर्षे) प्रतिदिन सकाळी साधकांसाठी ‘ऑनलाइन’ सत्संग घेत असत. त्या वेळी रूपश्री तिच्या आजीजवळ बसून शांतपणे सत्संग ऐकत असे. ती आठवड्यातून एकदा होणारा कन्नड भाषेतील भक्तीसत्संग ऐकते. ती भक्तीसत्संगातील भजन ऐकतांना नाचून आनंद व्यक्त करते. तिला भक्तीसत्संगात सांगितलेले समजत नाही, तरीही ती आनंदाने सत्संग ऐकते.

१ उ. पू. रमानंद गौडा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव 

१. पू. रमानंदअण्णा आमचे जवळचे नातेवाईक आहेत.

(पू. रमानंदअण्णांच्या पत्नी सौ. मंजुळाअक्का या रूपश्रीची आत्या आहेत.) रूपश्री चालायला शिकत असतांना एकदा पू. अण्णा घरी आले होते. तेव्हा रूपश्री आधी पू. अण्णांकडे गेली.

२. एकदा पू. अण्णा आमच्या घरी निवासाला येणार होते. त्या रात्री पू. अण्णांना आमच्या घरी यायला उशीर झाला. तेव्हा रूपश्री जागी राहून त्यांची वाट पहात होती. पू. अण्णा घरी आल्यानंतरही ती बराच वेळ जागी होती.

३. पू. अण्णा आमच्या घरी आल्यावर तिला पुष्कळ आनंद होतो. ती त्यांना नवीन वस्तू दाखवते. ते आमच्या घरून निघत असतांना रूपश्री त्यांच्या पाया पडते. ती तिच्या शब्दांत काहीतरी श्लोक म्हणते.

४. ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ पहाते आणि ग्रंथाला भावपूर्ण नमस्कार करते.

२. वय १ ते २ वर्षे 

२ अ. समंजस : तिच्या बोलण्यात आणि विचारांत प्रगल्भता जाणवते. तिला नीट बोलता येत नाही. तिला सर्व शब्द समजत नाहीत, तरीही ती तिला समजत असलेल्या शब्दांमध्ये सांगते.

२ आ. साधक सत्संगात सांगितलेली सूत्रे लिहून घेत असतात. तेव्हा रूपश्री वही आणि लेखणी घेऊन बसते.’

– सौ. लिखिता शशीधर गौडा (चि. रूपश्रीची आई), पेरियड्क, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (२६.५.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.