श्रीकृष्णाशी सूक्ष्मातून संवाद साधणारी देवद (पनवेल) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दुर्वा नित्यानंद भिसे (वय ८ वर्षे) !
दुर्वाला कधी कंटाळा येतो, तेव्हा ती श्रीकृष्णाशी बोलते. ती त्याला मनातील प्रसंग सांगते. एकदा तिला इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाचे उत्तर येत नव्हते. तेव्हा तिने त्या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्णाला विचारले. त्यानंतर तिला आतून जे उत्तर मिळाले, ते तिने उत्तरपत्रिकेत लिहिले आणि ते उत्तर योग्य होते.