उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. क्रियांश मुंदडा या पिढीतील एक आहे !
(‘क्रियांश’ हे श्रीकृष्णाचे एक नाव आहे.’ – संकलक)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्मापूर्वी
‘गर्भधारणा झाल्यावर मी नामजप करत असतांना आणि भगवद्गीता वाचत असतांना माझ्या पोटातील बाळाची हालचाल वाढत असे.
२. वय ३ ते ६ मास
अ. ‘क्रियांश शांत आहे’, असे सर्व जण म्हणतात.
आ. जेव्हा तो सर्वांकडे जातो, तेव्हा ‘तो कृष्णच आहे’, असे मला वाटते आणि माझा भाव जागृत होतो.
३. वय ६ ते ९ मास
अ. क्रियांश झोपून उठल्यावर मी ‘जय श्रीकृष्ण ।’, असे म्हणते. तेव्हा तो दोन्ही हात जोडून खोलीतील श्रीकृष्णाच्या चित्राला नमस्कार करतो.
आ. आम्ही दत्त आणि श्रीकृष्ण यांना नामजप करतो. तेव्हा तो ते नामजप शांतपणे ऐकतो.’
– सौ. नेहा मुंदडा (चि. क्रियांश याची आई), नागपूर
इ. ‘क्रियांशकडे पाहून छान वाटते. तो सतत हसतमुख असतो.
ई. तो अनोळखी व्यक्तीकडेही सहजतेने जातो.
उ. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्या छायाचित्रांकडे पाहून त्याला पुष्कळ आनंद होतो. तो त्यांना ‘आबा’, अशी हाक मारतो.
ऊ. तो आमच्या घरी आल्यावर त्याचे लक्ष सनातनच्या आकाशकंदिलाकडे जाते आणि तो दोन्ही हात वर करून ‘जय’, असे म्हणतो.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ पाहून त्याला पुष्कळ आनंद होतो.’
– कु. कार्तिकी ढाले (चि. क्रियांश याची मावस बहीण), नागपूर
४. वए.य ९ मास ते १ वर्ष
अ. ‘आम्ही जेव्हा ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव ।’ किंवा ‘हरि राधे, कृष्ण राधे, कृष्ण हरे हरे’, असे म्हणतो, तेव्हा क्रियांशचे शरीर डोलत असते. तो त्यामध्ये रमतो.’
– सौ. पुष्पा बारई (चि. क्रियांश याची आजी) आणि सौ. पूनम ढाले (मावशी), नागपूर
आ. ‘क्रियांशला गुरु-शिष्याच्या बोधचिन्हाविषयी विशेष आकर्षण आहे. सात्त्विक कापराची डबी, सात्त्विक उदबत्तीचे वेष्टन इत्यादींवरील हे बोधचिन्ह तो बारकाईने पहातो. तेव्हा त्याला आनंद होतो आणि तो ‘जय गुरुदेव ।’, असे म्हणतो.’
– श्री. शंकर बारई (चि. क्रियांश याचे आजोबा), नागपूर
५. क्रियांशचा स्वभावदोष
हट्टीपणा.’
– सौ. नेहा मुंदडा (चि. क्रियांश याची आई), नागपूर
(सर्व सूत्रांचा दिनांक : ४.१२.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.