
१. परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी घेत असलेल्या सत्संगात सहभागी दैवी बालक ऋषिमुनी यांच्याप्रमाणे दिसणे
‘मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या सत्संगात ‘दैवी बालक’ आणि ‘दैवी युवा साधक’ सहभागी झाले होते. त्या वेळी सर्व दैवी बालक आणि दैवी युवा साधक सूक्ष्मातून मला ऋषिमुनींसारखे दिसत होते. हे त्यांच्यात ऋषिमुनींसारखे व्यष्टी गुण, उदा. अल्प अहं, शिकण्याची वृत्ती, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य इत्यादी दाखवते, तसेच ‘भविष्यात त्यांच्याकडून ऋषिमुनींप्रमाणे समष्टी कार्य होणार’, असे त्या वेळी मला स्फुरले.
२. ऋषिमुनींप्रमाणे असणार्या दैवी बालकांमध्ये अधिकतर मुली असण्यामागील शास्त्र
वरील माहिती मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर त्यांनी मला विचारले, ‘मागील ३ युगांत समष्टीला साधना शिकवणारे ऋषी आणि मुनी अधिकतर पुरुष होते. कलियुगातील दैवी बालकांमध्ये अधिक प्रमाणात मुली आहेत. याचे कारण काय ?’ त्या संदर्भात मिळालेले ज्ञान पुढे देत आहे.

३. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमधील समष्टी कार्य करणारे अधिकतर ऋषी आणि मुनी पुरुष असणे, तर कलियुगात स्त्रियांकडून ते कार्य अधिक प्रमाणात होण्यामागील कारण
३ अ. व्यष्टी स्तर – सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये योग्य गुरूंच्या अभावी व्यष्टी साधनेत अडकलेल्या स्त्रियांची समष्टी साधना पूर्ण करण्यासाठी ईश्वराने त्यांना कलियुगात जन्म देणे : मोक्षप्राप्तीसाठी व्यष्टी आणि समष्टी दोन्ही प्रकारची साधना करावी लागते. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये अधिकांश स्त्रियांनी गृहस्थाश्रम आणि पातिव्रत्य धर्म यांचे पालन करून चांगली व्यष्टी साधना केली. या माध्यमातून धर्मव्यवस्थाही जोपासली गेल्याने त्यांची काही प्रमाणात समष्टी साधनाही झाली. असे असले, तरी त्यांनी ज्यांना गुरु मानले (त्यांचे पती) त्यांची आध्यात्मिक पातळी नव्हती. त्यामुळे योग्य मार्गदर्शनाच्या अभावी अधिकांश स्त्रिया व्यष्टी साधनेच्या विविध टप्प्यांत अडकल्या. कलियुगाचा काळ मोक्षप्राप्तीची अंतिम संधी आहे. यामुळे साधनेत अडकलेल्या जिवांची व्यष्टी आणि समष्टी साधना गतीने पूर्ण होण्यासाठी ईश्वर त्यांना वर्तमानकाळात ‘दैवी बालकां’च्या रूपात जन्म देत आहे. पूर्वजन्माची साधना असलेल्या अशा दैवी बालकांना वाईट शक्तींचा त्रास नसतो किंवा अत्यल्प प्रमाणात असतो, तसेच अशा दैवी बालकांची आध्यात्मिक पातळी चांगली असून त्यांच्यात पुष्कळ गुण असतात. त्यांची साधना पूर्ण होण्यासाठी वर्तमानकाळात ईश्वर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून त्यांना साधनेची शिकवण देत आहे.
३ अ १. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये योग्य गुरूंच्या अभावी व्यष्टी साधनेत अडकलेल्या स्त्रियांनी समष्टी धर्मसंस्थापनेत अडथळे निर्माण केल्याने ईश्वराने त्यांना साहाय्य न करता भोग भोगून बंधनातून मुक्त करणे
३ अ १ अ. स्त्रियांचा ‘मनोलय, बुद्धीलय आणि अहंलय’, या प्रक्रियेसाठी ‘पती हाच परमेश्वर’ म्हणजे ‘गुरु’ या प्रकारचे संस्कार त्यांच्यावर केले जाणे : सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांतील अधिकांश पुरुष गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारे असायचे. गुरु शिष्याला जे मार्गदर्शन करायचे, त्याप्रमाणे शिष्य घरी येऊन आचरण करत असल्याने घरातील स्त्रियांनाही आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळायचे. स्त्रियांना सामाजिक बंधने आणि अन्य कारणांमुळे घराबाहेर पडता येत नसल्याने त्यांना सगुण गुरुसेवा प्राप्त होऊन त्यांची ‘मनोलय, बुद्धीलय आणि अहंलया’ची प्रक्रिया होण्यासाठी ‘पती हाच परमेश्वर’ म्हणजे ‘गुरु’ या प्रकारचे संस्कार त्यांच्यावर केले गेले. अशा प्रकारे सर्वांची आध्यात्मिक उन्नती करणारी सामाजिक परंपराच निर्माण करण्यात आली होती.
३ अ १ आ. समाजाची सात्त्विकता अल्प झाल्यावर पुरुष अधर्माचरणी होणे; पण स्त्रियांच्या मनावरील संस्कार नष्ट न होणे : काळ पुढे-पुढे गेल्यावर समाजाची सात्त्विकता न्यून झाली. पुरुष मायेत अधिक वावरत असल्याने त्यांच्यावर अधिक परिणाम होऊन ते धर्माचरणापासून दूर होऊ लागले. असे असले, तरी व्यष्टी साधनेअंतर्गत स्त्रियांच्या मनावर झालेले ‘लग्न’ आणि ‘पातिव्रत्य’ यांचे संस्कार नष्ट झाले नाहीत. यामुळे स्त्रियांना ‘धर्माचरणासाठी पतीचा विरोध होणे’ इत्यादी प्रकार घडू लागले. काही ठराविक स्त्रियांनीच पतीचा विरोध सहन करून भगवद्भक्ती करण्याचे मार्ग अवलंबले, उदा. हिरण्यकश्यपूने पत्नीला साधना करण्यास विरोध केल्यावर तिने बाळंतपणी महर्षि नारद यांच्या आश्रमात जाणे.
३ अ १ इ. स्त्रियांच्या मनावर असलेल्या व्यष्टी साधनेच्या संस्कारामुळे त्यांनी अधर्माचरणी पतीला साहाय्य करून समष्टी कार्यात अडथळे निर्माण करणे आणि ईश्वराने शिक्षा म्हणून त्यांचे तपःसामर्थ्य नष्ट करणे : ‘पतीला गुरु समजून त्यांचे म्हणणे ऐकणे’, या प्रकारच्या साधनेमुळे स्त्रियांचा मनोलय आणि बुद्धीलय होत असला, तरी व्यष्टी साधनेच्या संस्कारांमुळे ती अधर्माचरणी पतीलाही साहाय्य करायची, उदा. जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी वृंदा हिचे सतित्व आणि सामर्थ्य यांमुळे देवतांना राक्षस जालंधरला पराभूत करणे शक्य न होणे. याप्रकारे व्यष्टी साधनेअंतर्गत अधर्मी पतीसाठी केले जाणारे व्रत, तप आणि सकाम प्रार्थना यांमुळे स्त्रिया एकप्रकारे समष्टी धर्मसंस्थापनेच्या कार्यात अडथळा बनत होत्या. त्यामुळे ईश्वरी तत्त्वाने त्यांना मार्गदर्शन केले नाही. साधनेच्या विशिष्ट टप्प्यात आणि सगुण देहात अडकलेल्या स्त्रियांचे तपःसामर्थ्य ईश्वराने विविध लीलांच्या माध्यमातून नष्ट केले, उदा. श्रीविष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदाचे (जालंधराच्या पत्नीचे) सतित्व नष्ट करणे इत्यादी.
३ अ १ इ १. व्यष्टी साधना करणार्या साधकाला ईश्वराने शिक्षेद्वारे, म्हणजेच प्रारब्ध भोगायला लावून बंधनातून मुक्त करणे : ज्या वेळी व्यष्टी साधना करणारे साधक एका टप्प्यात अडकून ईश्वर त्यांना सूक्ष्मातून करत असलेले मार्गदर्शन स्वीकारत नाहीत, त्या वेळी ईश्वर त्यांना मार्गदर्शन न करता त्यांच्याकडे साक्षीभावाने पहातो. ईश्वराच्या साक्षीभावामुळे व्यष्टी साधना करणार्या साधकाला ईश्वरी साहाय्य मिळत नाही. यामुळे त्यांना जीवनातील मंद, मध्यम आणि तीव्र सर्व प्रकाराचे प्रारब्ध भोगावे लागते. ‘ईश्वरी साहाय्याविना प्रारब्ध भोगण्यात साधना व्यय होते’, यालाच ‘आध्यात्मिक शिक्षा’, असे म्हणतात. या प्रकारच्या शिक्षेतून ईश्वर व्यष्टी साधकाला प्रारब्धभोग भोगायला लावून त्याचे कर्मफल नष्ट करतो आणि त्याला कर्मबंधनाकडून मुक्तीच्या दिशेने जाण्याची संधी देतो. याउलट समष्टी साधना करणार्या जिवांचे मंद आणि मध्यम प्रारब्ध अनुक्रमे साधना आणि गुरुकृपा यांनी नष्ट होते, तर खडतर प्रारब्धाची झळ अल्प करण्यासाठी ईश्वर त्याला विविध उपाय सुचवतो.
३ अ १ ई. स्त्रियांच्या मनावरील व्यष्टी साधनेच्या संस्कारामुळे त्यांनी गुरुतत्त्वाचे मार्गदर्शन ग्रहण न करणे आणि त्या दुःखात असतांना त्यांनी ईश्वराला आवाहन केल्यावर देवाने त्यांना आंतरिक मार्गदर्शन करणे : व्यष्टी साधनेमुळे जिवाची वृत्ती संकुचित होते. या संकुचित वृत्तीमुळे त्याला गुरुतत्त्वाचे मार्गदर्शन ग्रहण करणे शक्य होत नाही. हीच प्रक्रिया व्यष्टी साधनेचे संस्कार असलेल्या स्त्रियांच्या संदर्भातही घडली. अनेक जन्मांत विविध माध्यमातून ईश्वराने त्यांचे प्रबोधन केले, तरी ‘लग्न करून पतीला गुरु मानून त्यांनी सांगितल्यानुसार वागणे’, या स्वेच्छेमुळे त्यांनी गुरुतत्त्वाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केले. विवाहामुळे स्त्री-पुरुषाचे आपसात देवाण-घेवाण चक्र निर्माण होते. दोघांनी साधना केली, तर ते या चक्रातून एकत्रित मुक्त होतात, उदा. पू. प्रदीप खेमका आणि पू. (सौ.) सुनीता खेमका, पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार. याउलट दोघांपैकी एकाची प्रगती झाली किंवा एकाची अधोगती झाली, तर दुसर्याला तीव्र भोग भोगून ते देवाण-घेवाण चक्र म्हणजे प्रारब्ध संपवावे लागते. याच प्रकारे गुरुतत्त्वाचे न ऐकणार्या अनेक स्त्रियांवर ज्या वेळी दुःख भोगण्याची वेळ आली, त्या वेळी त्यांनी तळमळीने ईश्वराला आवाहन केल्यावर देवाने त्यांना आंतरिक मार्गदर्शन करून घडवले. गुरुतत्त्वाच्या या आंतरिक मार्गदर्शनामुळे प्रारब्धावर मात करून, तसेच आध्यात्मिक प्रगती करून त्या देवाण-घेवाण चक्रातून बाहेर पडल्या. यामुळे चांगली आध्यात्मिक पातळी (५० टक्क्यांहून अधिक) असलेली दैवी बालके सनातनमध्ये येत आहेत.
३ अ १ ई १. आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक असलेली दैवी बालके समष्टी साधना करण्यासाठी ‘सनातन’मध्ये येणे : जिवाची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक असणे, हे त्याचे अल्प प्रारब्ध आणि अधिक क्रियमाण कर्म करण्याची शक्ती (टीप) दर्शवते, यामुळे व्यष्टी प्रारब्ध अल्प असलेले आणि समष्टी साधना करून आध्यात्मिक प्रगती करण्याचे ध्येय असलेली दैवी बालके सनातनमध्ये येत आहेत; कारण ‘सनातन’हे समष्टी साधना शिकवण्याचे गुरुकुल आहे.
टीप – आध्यात्मिक पातळीनुसार प्रारब्ध आणि क्रियमाण यांचे प्रमाण
टीप १ – प्रारब्धाचा अर्थ
अ. शारीरिक प्रारब्ध : देहाशी संबंधित प्रारब्ध, उदा. रोग, अपंगता इत्यादी
आ. मानसिक प्रारब्ध : प्रारब्धानुसार मनाला होणारे सुख-दु:ख
इ. आध्यात्मिक प्रारब्ध : अन्य जिवांशी असलेले देवाण-घेवाण
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), ढवळी, फोंडा, गोवा. (क्रमश:)
या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/?p=874957&preview=true
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |