धर्माचरणाची आवड आणि धर्माभिमान असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उडुपी, कर्नाटक येथील कु. मनस्वी भंडारी (वय १२ वर्षे) ! 

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मनस्वी भंडारी ही या पिढीतील एक आहे !

पौष कृष्ण षष्ठी (२०.१.२०२५) या दिवशी कु. मनस्वी भंडारी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. मनस्वी भंडारी

(‘वर्ष २०१६ मध्ये कु. मनस्वी भंडारी हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

कु. मनस्वी भंडारी हिला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. मनस्वी भंडारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१९.१२.२०२४)


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 

१. व्यवस्थितपणा

सौ. मल्लिका भंडारी

‘मनस्वी स्वतःच्या वस्तू व्यवस्थित ठेवते. ती घरातील खोली आधी नीटनेटकी करते आणि नंतर अभ्यास करते. ‘ती केवळ स्वतःच्या वस्तूच नाही, तर घरही व्यवस्थित रहावे’, यासाठी प्रयत्न करते.

२. स्वावलंबी

ती शाळेत जाण्याची सिद्धता स्वतःच करते.

३. नम्रता

ती मोठ्या व्यक्तींशी आदराने बोलते. तिच्यामध्ये असलेल्या या गुणामुळे शाळेतील शिक्षक तिची प्रशंसा करतात.

४. काटकसरी

आम्ही दुकानात गेल्यावर मनस्वीला ‘तुझ्यासाठी कपडे, खाऊ किंवा पादत्राणे घेऊ का ?’, असे विचारतो. तेव्हा ती म्हणते, ‘‘आता आहे तेवढे पुरे ! लागेल तेव्हा घेऊया.’’

५. अंतर्मुख

मनस्वी घरी अधिक न बोलता स्वतःचे काम करत रहाते. ती अंतर्मुख असते.

६. स्वीकारण्याची वृत्ती

मनस्वीचे आई-वडील दुसर्‍या ठिकाणी रहातात. ती त्याविषयी कधीही तक्रार करत नाही. ती माझ्याजवळ (आजीजवळ) शांतपणे रहाते.

७. समंजस

आम्ही काही वेळा एखाद्या घडलेल्या प्रसंगाविषयी नकारात्मक बोलत असतांना ती आम्हाला सांगते, ‘‘प्रसंगाचा स्वीकार करा. आपल्या समवेत गुरुदेव आहे. ते साहाय्य करतील. आनंदाने रहाण्याचा प्रयत्न करा.’’ अशा प्रकारे ती आम्हाला सकारात्मक रहाण्याची जाणीव करून देते.

८. सात्त्विकतेची आवड

अ. तिला सात्त्विक कपडे घालायला आवडतात. नातेवाइकांनी तिला ‘शर्ट-पँट’ असा पोशाख दिल्यास ती आम्हाला शांतपणे सांगते, ‘‘हे सात्त्विक कपडे नाहीत. मी ते घालणार नाही.’’

आ. मनस्वी फावल्या वेळेत भ्रमणभाषवर अन्य विषय न पहाता बालसंस्कार वर्गाचा ‘व्हिडीओ’ पहाते आणि त्यात सांगितल्यानुसार अनुकरण करण्याचा प्रयत्न करते.

इ.  ती सात्त्विक आहारच घेते. ती बेकरीत बनवलेले पदार्थ किंवा ‘जंक फूड’ खात नाही.

९. धर्माचरणी

अ. तिला श्रीमद्भगवद्गीता यातील बहुतांश अध्याय मुखोद्गत आहेत.

आ. ती साधक आणि नातेवाईक यांच्याशी बोलण्यापूर्वी हात जोडून नमस्कार करते. (ती लहानपणापासूनच हस्तांदोलन करण्यासाठी नकार देत असे. तिला पाहून आमचे सर्व नातेवाईक ‘नमस्कार’ असे म्हणतात.)

इ. ती सर्वांना सांगते, ‘‘वाढदिवस तिथीनुसार साजरा करूया.’’ ती तिच्या मैत्रिणींनाही सात्त्विक पद्धतीने आणि तिथीनुसार वाढदिवस साजरा करायला सांगते.

ई. ती प्रतिदिन सकाळी घराच्या उंबरठ्याजवळ रांगोळी काढते. ती श्लोक म्हणते आणि आरती करते.

१०. धर्माभिमानी

मनस्वीला शाळेत घेऊन जाणारे रिक्शाचालक हिंदु होते. ‘त्यांनी धर्मांतरण केले आहे’, असे मनस्वीला समजले. तेव्हा तिने त्यांना सांगितले, ‘‘तुमच्या मुलांना बायबल वाचायला शिकवणे अयोग्य आहे.’’ त्यानंतर ती आम्हाला म्हणाली, ‘‘मी त्या मामांच्या रिक्शातून जाणार नाही. मला शाळेत पोचवण्यासाठी दुसरे रिक्शाचालक ठरवूया.’’

११. व्यष्टी साधना

ती प्रतिदिन सकाळी उठल्यावर श्रीकृष्ण, श्रीराम आणि गुरुदेव यांना प्रार्थना करते. ती महर्षींनी सांगितल्यानुसार सकाळी ‘हरि ॐ निसर्गदेवो भव । वेदम् प्रमाणम् ।।’, असे म्हणते. ती शाळेत जाण्यापूर्वी काही वेळ नामजप करते. ‘स्वतःला आध्यात्मिक त्रास होत आहे’, असे तिच्या लक्षात आल्यास ती स्वतःच मिठाच्या पाण्यात पाय ठेवून दत्ताचा नामजप करते. ती आम्हाला तिची दृष्ट काढायला सांगते.

१२. चुकांविषयी संवेदनशील

ती तिच्याकडून झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना करते. तिच्याकडून चूक झाल्यास तिला पश्चात्ताप होतो. तिच्याकडून चूक झाल्यास ती प्रायश्चित्त घेते. ‘आम्ही अनावश्यक बोलत आहोत’, असे तिच्या लक्षात आल्यास ती आम्हाला त्याची जाणीव करून देते.

१३. गुरुंप्रती भाव

एखाद्या व्यक्तीने मनस्वीला ‘‘तू कोण आहेस ?’’, असे विचारल्यावर ती म्हणते, ‘‘मी गुरुदेवांची मुलगी आहे.’’ ती शाळेत जातांना गुरूंना नमस्कार करते आणि त्यांना सूक्ष्मातून समवेत घेऊन जाते. तिला ‘संपूर्ण दिवस गुरु समवेत आहेत’, असे वाटते. ती दिवसभरात अनेक वेळा गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करते.

– सौ. मल्लिका भंडारी (मनस्वी हिची आजी), उडुपी, कर्नाटक. (९.५.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.