समंजस आणि उत्तम निरीक्षणक्षमता असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. बिल्वा अनगरकर (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. बिल्वा अनगरकर ही या पिढीतील एक आहे !

कु. बिल्वा अनगरकर

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. जन्मापूर्वी

अ. ‘गर्भारपणात मी पुष्कळ आनंदी होते.

आ. मी गर्भार असतांना प्रतिदिन घरातील बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळस वहात असे. ८ व्या मासात आमच्या घरी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे षोडशोपचार पूजनही केले होते.

२. वय १ ते ५ वर्षे

सौ. दीपा अनगरकर

२ अ. बिल्वा लहानपणापासूनच अतिशय समंजस आहे.

२ आ. देवाची ओढ : तिला ‘देवाला नमस्कार कर’, असे सांगितल्यावर ती लगेच देवाला नमस्कार करते. ती देवघरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीला फूल आणि हळद-कुंकू वहाते. ती या सर्व कृती अतिशय मनापासून करते.

२ इ. ‘घरी येणार्‍या साधकांना घर सापडावे’, यासाठी इमारतीच्या खालच्या मजल्यावर जाऊन त्यांना घरी घेऊन येणे : एकदा आमच्या घरी काही साधक येणार होते. तेव्हा मी घरातील कामात व्यस्त होते. साधक इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यावर इमारतीच्या सुरक्षारक्षकाचा मला भ्रमणभाष आला. त्या वेळी ‘साधकांना घर सापडावे’, यासाठी बिल्वा स्वतः खालच्या मजल्यावर जाऊन उभी राहिली आणि साधकांना वर घेऊन आली. ही कृती तिने स्वतःहून केली.

३. वय ५ ते ८ वर्षे

३ अ. उत्तम निरीक्षणक्षमता आणि शिकण्याची वृत्ती : एकदा आम्ही सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा बिल्वाची आश्रमातील श्री. गुरुप्रसाद बापट यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तिला विचारले, ‘‘आश्रम पहातांना तुला सर्वांत अधिक काय आवडले ?’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘मला सूक्ष्म जगताविषयीची माहिती फार आवडली.’’ नंतर तिला त्या दादांनी विचारले, ‘‘तुला तेथे काय शिकायला मिळाले ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘जशा चांगल्या शक्ती असतात, तशाच वाईट शक्तीही असतात अन् त्या आपल्याला त्रास देतात. ‘त्यांच्यापासून आपले रक्षण व्हावे’, यासाठी नामजपादी उपाय गांभीर्याने करायला हवेत’, असे मला शिकायला मिळाले.’’

३ आ. समष्टी भाव : ‘साधकांना वाईट शक्तींचे त्रास होतात’, हे कळल्यावर तिला वाईट वाटले आणि तिने देवाला ‘साधकांना होणारे त्रास दूर होऊ दे आणि त्यांची छान प्रगती होऊ दे’, अशी प्रार्थना केली.

३ इ. रामनाथी आश्रमाविषयीची ओढ : रामनाथी आश्रमातून निघतांना बिल्वा आश्रमातील ओळख झालेल्या सर्व साधकांना भेटून आली. तिला रामनाथी आश्रमातून निघतांना वाईट वाटत होते. ‘तिला आश्रमातून जावे’, असे वाटत नव्हते.

३ ई. आईला साधनेत साहाय्य करणे : एकदा सौ. सविता शेणवीकाकू मला ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न कसे करायचे ?’, हे सांगत होत्या. तेव्हा बिल्वा माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, ‘‘आई, महत्त्वाची सूत्रे लिहून घे.’’

३ उ. भाव : एकदा दूरचित्रवाणीवर ‘देऊळ बंद !’, हा मराठी चित्रपट लागला होता. (‘देऊळ बंद !’, हा श्री स्वामी समर्थ यांच्यावर आधारित चित्रपट आहे.) तो संपूर्ण चित्रपट पहातांना बिल्वाची भावजागृती होऊन तिच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.

३ ऊ. बिल्वाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती 

३ ऊ १. बिल्वामध्ये देवीचे रूप दिसणे

अ. आम्ही बिल्वाला वणी (जिल्हा नाशिक) येथील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी घेऊन गेलो होतो. ती मंदिरात बसलेली असतांना तेथील एका व्यक्तीने तिच्याकडे बघून आम्हाला सांगितले, ‘‘तुमची मुलगी अगदी देवीच वाटते.’’

आ. मी रामनाथी आश्रमाच्या भोजनकक्षात बसलेली असतांना बिल्वा माझ्याशी बोलत होती. तेव्हा एक ताई माझ्याकडे आल्या अणि मला म्हणाल्या, ‘‘ही तुमची मुलगी आहे का ? ती ध्यानमंदिरात माझ्या जवळच बसली होती. तेव्हा मला तिच्यामध्ये देवीचे रूप दिसले.’’

४. कु. बिल्वाचे स्वभावदोष 

हट्टीपणा आणि राग येणे’

– सौ. दीपा अनगरकर (कु. बिल्वा हिची आई), पुणे (१३.१०.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक