उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. दिविशा चौधरी ही या पिढीतील एक आहे !
(दिविशा म्हणजे देवी.)
३०.१.२०२५ (माघ शुक्ल प्रतिपदा) या दिवशी चि. दिविशा दीपक चौधरी हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि आजी-आजोबा यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. दिविशा दीपक चौधरी हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्मापूर्वी
अ. ‘मला गर्भधारणा झाल्यापासून माझा दत्ताचा नामजप सतत चालू होता.

आ. मी प.पू. गुरुदेवांच्या शंकानिरसन, त्यांचे साधकांना मार्गदर्शन आणि साधना प्रवचन यांच्या ध्वनीफिती, तसेच नामजपाच्या ध्वनीफिती आणि भावगीते प्रतिदिन ऐकत होते.
इ. मी प्रतिदिन श्रीरामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र, अथर्वशीर्ष आदी स्तोत्रे ऐकत होते. तेव्हा ‘गर्भ आतून ऐकत आहे, प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवायचे.
२. जन्म ते ३ मास
अ. चि. दिविशा जन्मापासून पुष्कळ शांत आहे. ती विनाकारण रडली नाही किंवा तिने कधी त्रास दिला नाही. तिने कधीही रात्रभर जागवले नाही.
आ. आम्ही भ्रमणभाषवर नामजप, प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन, प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) मार्गदर्शन लावल्यावर दिविशा ते शांतपणे ऐकते.
इ. आम्ही भ्रमणभाषवर श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा पाळणा लावल्यावर ते ऐकत ती झोपायची. तिची झोपेत ध्यानमुद्रा असते.
ई. तिच्या शरिरावरून मोराचे पीस फिरवल्यावर ती शांत झोपत असे. तिला शरिरावरून मोराचे पीस फिरवलेले आवडते.
३. वय ४ मास ते ६ मास

३ अ. दिविशाचा अन्नप्राशन विधी जळगाव सेवाकेंद्रात होणे
१. आम्ही दिविशाला घेऊन जळगाव सेवाकेंद्रात अन्नप्राशन विधीसाठी गेल्यावर ती ध्यानमंदिरातील प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकडे एकटक पहात होती. तिला खाली बसवले होते. तेव्हा ती डोके वर करून हात हलवत होती. ती ‘प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे हात करून हातानेच इकडे या’, अशी खूण करून त्यांना बोलवत आहे’, असे मला जाणवत होते.
२. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी तिला खीर भरवल्यानंतर तिने लगेच खीर खाल्ली.
३. ‘बाळ सात्त्विक आहे ’, असे सद्गुरु जाधवकाकांनी सांगितले.’
– सौ. सायली दीपक चौधरी (पूर्वाश्रमीची कु. सायली दत्तात्रय वाघुळदे, चि. दिविशाची आई), जळगाव
४. वय ६ मास ते १ वर्ष
अ.‘ दिविशा हसतमुख आहे.

आ. ती सर्वांना हवीहवीशी वाटते.
४ इ. देवाची ओढ
१. ‘आम्ही ‘राम राम’ म्हटले की, ती टाळ्या वाजवते.’
– सौ. किरण दत्तात्रय वाघुळदे (चि. दिविशाची आजी, आईची आई), जळगाव
२. ‘आम्ही तिला आमच्या घराजवळील शिव मंदिरात नेल्यावर तेथील गाभार्यात तिला चांगले वाटते.
३. तिला आमच्या घरातील श्रीकृष्णाचे चित्र दाखवल्यावर ती त्या चित्राकडे एकटक पहाते.’
– श्री. दत्तात्रय मिठाराम वाघुळदे (चि. दिविशाचे आजोबा, आईचे वडील, आध्यत्मिक पातळी ६७ टक्के, वय ६२ वर्षे), जळगाव
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ७.१.२०२५)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.