उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. शिवानी नायक ही या पिढीतील एक आहे !
पौष कृष्ण एकादशी (२५.१.२०२५) उडुपी, कर्नाटक येथील कु. शिवानी नायक हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. शिवानी बाळकृष्ण नायक हिला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्म ते २ वर्ष
‘चि. शिवानीला भक्तीगीते ऐकल्यावर आनंद होत असे.
२. वय २ ते ४ वर्षे
अ. शिवानीला पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४८ वर्षे) यांच्याशी बोलतांना आणि त्यांचे छायाचित्र पहातांना आनंद होत असे.
आ. तिला ‘तू कोण आहेस ?’, असे विचारल्यावर ती ‘मी कृष्णाची गोपी आहे’, असे सांगत असे.

इ. आम्ही हिंदु राष्ट्र-जागृती सभेला गेल्यावर ती स्वतःहून घोषणा देत असे.
३. वय ४ ते ६ वर्षे
३ अ. सेवा करायला आवडणे : शिवानी सत्संगाला गेल्यावर पाण्याच्या बाटल्या भरून ठेवणे आणि आसंद्या पुसून रांगेत लावणे, अशा सेवा करते.
३ आ. चुकांविषयी संवेदनशील : तिला स्वतःच्या आणि घरातील व्यक्तींच्या चुका लगेच लक्षात येतात. ती त्याविषयी आम्हाला सांगते.
३ इ. नामजपादी उपायांचे गांभीर्य : ती सांगते, ‘‘आपण भ्रमणभाष पाहिल्यावर किंवा दूरदर्शन वाहिन्यांवरील असात्त्विक कार्यक्रम पाहिल्यावर आपल्यावर आवरण येते. आपल्यावरील आवरण दूर होण्यासाठी आपण नामजपादी उपाय करायला हवेत.’’
३ ई. संतांप्रती भाव : पू. रमानंद गौडा प्रसारासाठी आमच्या गावी येणार असल्यास शिवानी त्यांची वाट पहाते. ते घरी आल्यावर शिवानी त्यांच्याशी उत्साहाने बोलते.’
– श्री. बाळकृष्ण नायक (कु. शिवानीचे वडील), उडुपी, कर्नाटक. (१०.६.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.