कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याचे सांगून एका नामांकित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना ‘होम क्वारंटाईन’ होण्याचा सल्ला

‘तुम्ही काही दिवसांपूर्वी तपासणी केलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तुम्ही पुढचे १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ व्हा आणि औषधे घ्या’, असे सांगत एका व्यक्तीने एका नामांकित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना २१ मार्चला भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला.