सायबर चोरीच्या वेगवेगळ्या घटना सतत घडत आहेत. यावरून त्यांच्यावर कुणाचा अंकुश नाही, असेच लक्षात येते. पोलिसांनी याच्या मुळाशी जाऊन अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करावेत !
पुणे – ‘चेकबूक संपल्यामुळे मला तात्काळ एकाला रक्कम द्यायची आहे. कृपया अधिकोषाने ‘आर्.टी.जी.एस्.’द्वारे रक्कम वर्ग करावी’, असा व्यापार्याच्या बनावट स्वाक्षरीचा ई-मेल ९ मार्च या दिवशी सायबर चोरट्याने मार्केट यार्डातील खासगी अधिकोषाला पाठवला. त्यानुसार अधिकोषाने तक्रारदारांकडे कोणतीही निश्चिती न करता ३६ लाख ५८ सहस्र रुपयांची रक्कम सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यात पाठवून दिली. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक लोखंडाचे व्यापारी आहेत. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिकोषाकडील माहिती मागवली असून त्यानुसार अन्वेषण चालू असल्याची माहिती मार्केट यार्ड पोलिसांनी दिली आहे.