साळगाव येथे आंतरराज्य वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस

गुन्हे अन्वेषण विभागाने साळगाव येथील व्हॅली व्हीव रिसोर्टमधून कार्यरत असलेले आंतरराज्य वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणले आहे. संकेतस्थळ आणि ‘ऑनलाईन’ विज्ञापने यांच्या माध्यमातून हे रॅकेट चालू होते.

पोलीस दलात परीक्षेसाठी बनावट उमेदवार देणार्‍या सूत्रधारास अटक 

कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलामध्ये हवालदार आणि आय.आर्.बी. नेमणुकीसाठी २२ नोव्हेंबर या दिवशी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला बनावट उमेदवारांनी परीक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

 ब्रिटनमध्ये वर्ष २००५ मध्ये १३ वर्षीय मुलीवर इमामाकडून मशिदीमध्ये बलात्कार

इमामाने १३ वर्षांच्या विद्यार्थिनीला पुस्तक देण्याच्या बहाण्याने शौचालयात नेले आणि कुकर्म केले

कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबियांना फरारी घोषित करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयाकडे अर्ज

कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबियांना फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी अंमलबजावणी संचालनालयाने ४ डिसेंबर या दिवशी विशेष ‘पीएम्एलए’ न्यायालयाकडे केली आहे. त्यांची संपत्तीही कह्यात घेण्याची अनुमती अंमलबजावणी संचालनालयाने मागितली आहे.

शिकारीसाठी अवैधरित्या शस्त्रे घेऊन फिरणारे १६ जण पोलिसांच्या कह्यात

एवढ्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रे केवळ शिकारीसाठीच बाळगली असतील, यावर विश्‍वास कसा ठेवायचा ?

देवगड येथे गुटख्याची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी एकाला अटक

८६ सहस्र ६४० रुपये किमतीचा गुटखा आणि पानमसाला कह्यात

रेखा जरे हत्या प्रकरणात पत्रकारानेच सुपारी देऊन केली हत्या !

रेखा जरे यांची हत्या ३० नोव्हेंबरच्या रात्री धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून करण्यात आली. पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

अन्वय नाईक आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांकडून आरोपपत्र प्रविष्ट

अन्वय नाईक आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग सत्र न्यायालयात ४ डिसेंबर या दिवशी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.

कोरोनाच्या बनावट लसीची विक्री करण्यासाठी गुन्हेगारी जगत सक्रीय होण्याची शक्यता ! – इंटरपोलची चेतावणी

लवकरच जगातील विविध देशांमध्ये कोरोनावर लस येण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लसीकरणला प्रारंभही होणार आहे.

पुण्यात हवाला व्यवहारावर गुन्हे शाखेची कारवाई !

अवैध गुटखाविक्रीद्वारे प्राप्त केलेल्या मोठ्या रक्कमेची हवाला व्यवहाराच्या माध्यमातून देवाणघेवाण करण्याचा प्रकार गुन्हे शाखेने २ डिसेंबरच्या मध्यरात्री उघडकीस आणला.