|
बारवाणी (मध्यप्रदेश) – येथील सेंधवा तालुक्यातील डोंडवा गावाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणार्या एका ट्रकला अपघात झाल्यावर तो पलटी झाला. त्यामुळे ट्रकमधील कोंबड्या रस्त्यावर आल्या. याचा अपलाभ घेत गावकर्यांनी या कोंबड्या गोळा करून ट्रकचालकाला देण्याऐवजी त्या घरी नेल्या. एकेका गावकर्याने २-३ कोंबड्या नेल्याचेही दिसून आले.
अनेकांनी अधिकाधिक कोंबड्या पकडून घेऊन जाण्यासाठी मोठ्या आकाराच्या पिशव्याही आणल्या होत्या. गाडीमध्ये एक सहस्राहून अधिक कोंबड्या होत्या; मात्र शेवटी यातील केवळ ३०० ते ३५० इतक्याच कोंबड्या उरल्या. ट्रकचालकाने सांगितले की, याविषयी पोलिसांना दूरभाष करून सांगितले; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या अपघातामुळे दीड ते २ लाख रुपयांची हानी झाली. (अशा निष्क्रीय पोलिसांवर मध्यप्रदेश सरकार कठोर कारवाई करणार का ? – संपादक)